भाजक्या पोह्यांचा चिवडा

भाजक्या पोह्यांचा चिवडा | झटपट आणि कुरकुरीत | Diwali chivda recipe in Marathi

नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग आहे Diwali chivda recipe in Marathi | भाजक्या पोह्यांचा चिवडा रेसिपी. आज आपण दिवाळी स्पेशल असा चिवड्याचा प्रकार पाहणार आहोत यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे.

भाजक्या पोह्यांचा चिवडा साहित्य :-

अर्धा किलो भाजके पोहे घ्यावेत चांगले निवडून आणि चाळून घ्यावेत

दीड वाटी शेंगदाणे घ्यावेत आवडीनुसार खोबऱ्याचे काप पंढरपुरी डाळ्या एक वाटी घ्यावे जर डाव्या मिळाल्या नाहीत तर प्लेन बुंदी सुद्धा चालेल ती 100 ग्रॅम घ्यावी अर्धी वाटी तुकडे केलेले हिरव्या मिरच्या चिरलेला कढीपत्ता लागेल एक वाटी वाळलेला कांदा चवीनुसार तिखट मीठ थोडीशी पिठीसाखर

फोडणीसाठी लागणारे साहित्य

हिंग मोहरी हळद मूठभर धने आणि तीळ हे सर्व व्यवस्थित जमा करून ठेवावे

भाजक्या पोह्यांचा चिवडा रेसिपी

चिवडा कृती :-

पोहे चाळूण घेणे

निवडलेले पोहे उन्हात चांगले वाळवून घ्यावेत आपल्याकडे नेहमीची असणारी गव्हाची चाळणी घ्यावी आणि त्यांनी चालून घ्यावे म्हणजे त्याच्यात असणारी भट्टीतली वाळू खाली पडू आणि ती खाण्यात येत नाही.

शेंगदाणे आणि खोबरे तळणे

एक लहान कढई घ्यावी त्यात शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत तळून घ्यावे पण हे जास्त गरम होऊन जळणार नाही याची काळजी घ्यावी

Diwali chivda recipe in Marathi | भाजक्या पोह्यांचा भाजके पोहे चिवडा रेसिपी कसा बनवायचा

फोडणी तयार करणे

आता एक मोठी कढई घ्यावी त्यात फोडणीसाठी लागणारे तेल घ्यावे तेल थोडेसे गरम झाल्यानंतर त्यात मोहरी हिंग हळद टाकून फोडणी तयार करावी त्याच्यात वाळवलेला कांदा बारीक करून टाकावा आणि त्यातच मिरच्यांचे तुकडे धने आणि कढीपत्ता टाकून हे सर्व मिश्रण खुसखुशीत होईपर्यंत तळावे.

मिश्रण एकत्र करणे

Diwali chivda recipe in Marathi| भाजक्या पोह्यांचा भाजके पोहे चिवडा रेसिपी कसा बनवायचा

याच्यानंतर गॅस कमी करावा आणि त्यावरती आपण चालून घेतलेले भाजके पोहे वरती वरतून टाकावेत आणि त्यांना वर पासून खालपर्यंत पूर्ण परतावे सगळीकडे पोह्यांना सारखा पिवळा रंग येईल याची दक्षता घ्यावी म्हणजेच सगळीकडे एकच चव सारख्या पद्धतीने पोहोचेल

भाजक्या पोह्यांचा चिवडा महत्व

बाकीच्या चिवड्यांपेक्षा या भाजक्या पोह्याच्या चिवड्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा जास्त कुरकुरीत होतो. कमी तेलात होतो. हा चिवडा मऊ पडू नये यासाठी कधीही उघड्यावर ठेवू नये. गार झाल्यावरती लगेच डब्यात भरून ठेवावा आणि जसा लागेल तसा थोडा थोडा घेऊन खावा

स्वादिष्ट बासुंदी घरी बनवायची आहे ? रेसिपी वाचण्यासाठी क्लिक करा.

पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.

बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *