मंगल राजाराम यादव आणि कोमल मेश्राम यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत diwali par poem in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
diwali par poem in marathi
काव्य बंध समूह आयोजित,काव्यलतिका स्पर्धा.
दि-२९/१०/२०२३
विषय-सण दिव्यांचा
दिपावली | diwali par poem in marathi

अश्विन वद्य त्रयोदशी,
कार्तिक शुद्ध द्वादशी महोत्सव,
पाच दिवसांची ही उत्सवशृंखला,
पणत्या, मेणबत्त्या,समयांचा उत्सव…१
सण भारी दिव्यांची रोषणाई,
जीवनातील अंधार नष्ट करी,
ज्ञानाने अज्ञान दूर करी,
कष्टाने नष्ट दारिद्रय जरी…२
घातक रूढींचा पगडा घालवूनी,
बंधुभावाचा समाजात उजेड पसरी,
घरीदारी,परिसर अस्वच्छता घालवूनी,
चकाचक रात्र भूवरी हसरी…३
दुर्गुणरूपी राक्षस नष्ट करूनी,
सद्गुणांचा अखंड दिवा लावू,
आप्तस्वकीयांच्या बरोबर गोरगरीबांच्याही,
जीवनात उदंड आनंद चैतन्य वाहू…४
नरक म्हणजे घाण,
तिचा नाश करूनी,
परिसर स्वच्छतेचा साज,
रोगांना लावी पळवूनी…५
दहशतवाद, काळाबाजार, तस्करी,
लाचलुचपत यांचा नरकरूपी सुळसुळाट,
टाचेखाली टाकुया चिरडूनी,
निर्मळ पवित्रतेचा करू झगमगाट..६
हव्यास नको अति धनसंपत्तीचा,
गरजवंताची भागवावी गरज,
तेच खरे मानावे जीवनवैभव,
आत्मसुखाचा तोच खरा धर्मराज..७
एकाच वेलीवरची दोन फुले,
बहिण -भाऊ त्यांची गुंफण,
आयुष्य भराची लाख मोलाची ठेवण,
भेटीसाठी नको विरजनाचे कुंफण…८
दिपावलीच्या व्दिगुणित आनंदोत्सवाला,
अनोख्या दिव्यांनी रात्री उजळवावे,
उत्तम विचार आणि निर्मळ आचरण,
मन अंतरंगी दिव्यांनी सजवावे..९
मंगल राजाराम यादव.
शिराळा जि सांगली.
diwali par poem in marathi
स्पर्धेसाठी
काव्यबंध समुह आयोजित काव्यलतिका स्पर्धा दि.२९/१०/२१
विषय – सण दिव्यांचा
दिवाळी | diwali par poem in marathi

आला आला हो
दिव्यांच्या सण आला
चोहीकडे परिसर प्रकाशमय झाला
दुरावलेले कुटुंब
सणासुदीला जवळ आले
एकमेकांना आपुलकीने शुभेच्छा देऊ लागले
झाले गेले विसरूनी जावे
अंधारलेली मने आणि माणसे
दिव्यासारखे प्रकाशित व्हावे
माझी दिवाळी तुझी दिवाळी
फरक आहे आपुल्या कपाळी
नवी कोरी सजलेली दोरी आहे तुझ्या घरी
आजही जुनाट तोरण लावल आहे माझ्या दारी
दिव्यांचा सण हा साजरा
सर्वांच्या व्हावा घरोघरी
अंधारलेली वाट जणू शोधते
प्रकाशाची ज्योत दारोदारी
दिव्यांचा झगमगाटात
सर्वांचं आयुष्य उजळाव
दुःखात जरी असल कुणी
तरी या दिवाळीत थोडं हसावं
आनंदाच्या या सणात सर्वांनी
मन भरून जगाव
नेहमी या दिव्यांच्या सणात
जिव्हाळ्यांन सर्वांनी सोबत नांदाव
कोमल मेश्राम

diwali par poem in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह