द्रोणाचार्य हे पांडव आणि कौरवांचे गुरु होते. महाभारत कालीन महारथी योध्यांमध्ये त्यांचे नाव अव्वलस्थानी घेतले जात असे. पांडवांना भीष्म पितामहानंतर जर कुणाचे भय होते तर ते म्हणजे गुरु द्रोण. श्रीकृष्णाने मग अशी कोणती युक्ती केली कि ज्यामुळे गुरु द्रोण मारले गेले ? चला तर पाहूया Dronacharya Story In Marathi
युधिष्टीराचे अर्ध सत्य | Dronacharya Story In Marathi
महाभारतामध्ये जेव्हा गुरु द्रोणाचार्य यांनी विद्ध्वंस मांडला होता तेव्हा त्यांचे मरण अशक्यप्रतीत दिसत होते. भगवान श्रीकृष्ण पांडवांना सांगतात की गुरु द्रोणाचार्य मरण हे संभव आहे. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा ते शस्त्रांचा त्याग करतील. त्यासाठी त्यांना मानसिक वेदना द्याव्या लागतील. त्यांना मानसिक वेदना देण्यासाठी अत्यंत दुखद वार्ता द्यावी लागेल.
द्रोनाचार्यांचे आपला पुत्र अश्वथामावर जीवापाड प्रेम होते. त्यांनी अतिशय परिश्रम करून आपला पुत्र कधीही मरण पावू नये यासाठी देवांची आराधना केली होती. कित्येक वर्ष मृत्युंजय मंत्राचा जप केल्यानंतर अश्वथामा अमर झाला होता.
Dronacharya Story In Marathi
गुरु द्रोणाचार्य यांना त्यांचा पुत्र अश्वत्थामा खूप प्रिय प्रिय होता. श्रीकृष्णांनी एक योजना बनवली त्यामध्ये गुरु द्रोणाचार्यांना असे सांगण्यात यावे की अश्वत्थामाचा मृत्यू झाला आहे. जेव्हा ते हे ऐकतील तेव्हा त्यांना अति दुःख होईल. पण श्रीकृष्णाच्या हेही लक्षात आले कि नुसत्या सांगण्याने त्यांचा विश्वास अजिबात बसणार नाही. त्यांचा आपला शिष्य युधीष्टीरावर अतिशय विश्वास होता. ते त्याच्या कडून या घटनेची नक्कीच तपासणी करून घेतील. युधीष्टीराचाही एक गुणधर्म होता तो कधीही असत्य बोलत नसे.
या दोन्ही गुणधर्माचे संयुक्त मिश्रण करून श्रीकृष्णाने आपले कार्य साध्य करायचे ठरवले. त्यांनी युद्ध क्षेत्रामध्ये एक हत्ती ज्याचे नाव अश्वत्थामा होते त्याचा वध करण्यासाठी भिमास सांगितले. आणि “अश्वत्थामाचा वध झाला आहे” हि बातमी सर्व कुरुक्षेत्रावर पसरवली .

बलाढ्य द्रोणाचार्य कसे मारले गेले ? युधिष्टीराचे अर्ध सत्य | Dronacharya Story In Marathi
ही गोष्ट जेव्हा गुरु द्रोणाचार्य पर्यंत पोहोचते, ते सत्य जाणण्यासाठी युधिष्टरकडे जातात आणि त्यांना म्हणतात की माझा या गोष्टीवर विश्वास नाही. माझा पुत्र अमर आहे. माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे तू सत्यनिष्ठ आहेस हे मला माहित आहे आणि मला हे फक्त तुझ्या तोंडून खरे काय आहे हे ऐकायचे आहे. तेव्हा युधिष्ठीर म्हणतात “अश्वत्थामा हतो” ( अश्वथामा मेला ) आणि “नरो वा कुंजरो वा” (हत्ती कि माणूस ते माहित नाही )
परंतु श्रीकृष्ण येथेही चमत्कार दाखवतात “अश्वत्थामा हतो” म्हटल्या बरोबर श्रीकृष्ण आपला शंख वाजवतात त्यामुळे गुरु द्रोणाचार्य पर्यंत पूर्ण गोष्ट पोहोचत नाही. आणि आपला मुलगा गमावल्याचे वचन खरे कि खोटे ते शोधण्यासाठी ते आपले सर्व शस्त्र त्याग त्याग करून युद्धभूमीमध्ये ध्यानासाठी खाली बसतात.
असे म्हणतात कि कधीही खोटे न बोलण्याच्या युधीष्टीराच्या सवयीमुळे त्याचा रथ जमिनीपासून हातभार वरती हवेत चालत असे. वायुदेव स्वतः त्याच्या रथाचे वजन धारण करीत असत. पण जेव्हा युधिष्टिर “नरो वा कुंजरो वा” (हत्ती कि माणूस ते माहित नाही ) असे अर्ध सत्य द्रोणाचार्यांना सांगतो तेव्हापासून त्याचा रथ धरणीला चिकटून चालायला लागतो.
गुरु द्रोणाचार्य यांना शास्त्राचा त्याग करताना बघून द्रुपद पुत्र दृष्ट्दुन्म ज्याचा जन्म गुरु द्रोणाचार्य यांचा वध करण्यासाठी झालेला होता त्यांनी आपली तलवार हातात घेऊन गुरुद्रोणाचार्यांचे मस्तक उडवले.
बलाढ्य द्रोणाचार्य कसे मारले गेले ? युधिष्टीराचे अर्ध सत्य | Dronacharya Story In Marathi
द्रुपद पुत्र दृष्ट्दुन्म याने द्रोनाचार्यांचे शीर उडवले.
कुंतीपुत्र युधीष्टीरावर द्रोणाचार्यांचा सर्वात जास्त विश्वास होता.
बलाढ्य द्रोणाचार्य कसे मारले गेले ? युधिष्टीराचे अर्ध सत्य | Dronacharya Story In Marathi
अश्वथामा नावाच्या हत्तीला कुणी मारले ? आणि त्या बातमीने द्रोणाचार्य स्तब्ध का झाले ?
भीमाने अश्वथामा नावाच्या हत्तीला मारले. आणि द्रोणाचार्यांच्या मुलाचे नाव देखील अश्वथामा होते.
वाचा मरणापूर्वी कर्णाने असे कोणते प्रश्न विचारले कि ते ऐकून कृष्णाच्या देखील डोळ्यात पाणी आले ?
Pingback: येथे हनुमानजी दिसतील त्यांच्या पत्नी सोबत | Is Lord Hanuman Married Free Secret Information
Pingback: संकष्टी चतुर्थीला का आहे इतके महत्व ? | Best Sankashti Chaturthi Story In Marathi 2023
Pingback: कारगिल विजय दिवस : साहस आणि बलिदानाची कहाणी | Kargil Vijay Divas In Marathi Greatness Of 1999 Heros