Ektarfi prem kavita

Ektarfi prem kavita | प्रेमाची कविता मराठी | माझी प्रेम कहाणी

एका मुलीने सहज विचारलं मला
कारे कुणावर प्रेम करत आहेस का….?
मी म्हटलो तिला
थोडा वेळ मला देतेस का…
मी सांगतो तुला माझ्या प्रेमाची कथा….?
जी आहे जगातील प्रत्येक प्रेमीयुगुलांची व्यथा…..
Ektarfi prem kavita | प्रेमाची कविता मराठी | माझी प्रेम कहाणी

तुझ्यासारखी दिसायला गोंडस
लाल लाल गाल तिचे….
ओठ जणू गुलाबाची फुलं तिचे….
चंद्रानेही लाजून ढगाआड लपावं, असं तिचं रूप होतं….
आणि फुलाने ही तिच्या केसात माळण्याचा अट्टाहास करावं, असं स्वरूप होतं…..
बाह्य सौंदर्य जसं तिचं फुलाप्रमाणे फुललेलं होतं….
अगदी तसच मनाचं सौंदर्य देखील प्रफुल्लीत दिसत होतं….

Ektarfi prem kavita | प्रेमाची कविता मराठी | माझी प्रेम कहाणी

फुलपाखरा सारखे दिसणाऱ्या या मुलीला उडवून
कुणी आपल्या हृदयाच्या पिंजऱ्यात अडकवून ठेवेल
या भितीने मी क्षणभर ही विचार न करता प्रेम व्यक्त केलं….
तिने ही क्षणभर ही विचार न करता माझ प्रेम स्वीकार केलं….
वाटलं होतं खरचं तिलाही मी आवडलो असेन
म्हणून तिने लगेच मला असेल स्वीकारलं….
पण चुकलंच माझं
मला वाईट वाटू नये म्हणून तिने असं भासवलं….
हे मला तिनं कधीच नाही जाणवू दिलं….

Ektarfi prem kavita | प्रेमाची कविता मराठी | माझी प्रेम कहाणी

म्हणून माझं हृदय तिच्या प्रेमात आणखी गुंतत गेलं….
एक दोन वर्षानंतर तिच्या बाबांनी तिचं लग्न ठरवलं…..
हे तिने मला सांगून म्हणाली तुझं माझं इथचं संपलं…
हे ऐकून मला माझं जीव च गेल्यासारखं वाटलं….
म्हणून मी क्षणभर थांबून तिला विचारलं…
मग सांग प्रिये आपल्या प्रेमाचं काय झालं….

तिने क्षणभर ही न थांबता म्हटलं…
मी तुझ्यावर कधी प्रेम च नाही केलं…
तुला वाईट वाटू नये म्हणून मी तुला हो म्हटलं….
मी रडत रडत तिला उत्तर दिलं….
अगं वेडे हे तू आधी च असतं सांगितलं….
तर मी माझ्या हृदयाला तुझ्यात एवढं नसतं गुंतवलं….

Ektarfi prem kavita | प्रेमाची कविता मराठी | माझी प्रेम कहाणी

वाईट तेव्हा वाटत न्हवतं मला
वाईट तर मला आता वाटत आहे….
प्रेम करून मी पागल आहे की
मला वाईट वाटू नये म्हणून हो म्हणणारी तू समजदार आहे
हाच प्रश्न मला पडत आहे….
आता तू याचा विचार करू नको…
लग्न करून सुखी रहा रडत बसू नको…
मी तुझी आठवणीत जगेन आणि मरण आलं तर मरेन…
पण प्रेम केलंय ना एकदा तर आयुष्यभर करेन…

खऱ्या प्रेमाची हीच तर कथा आहे
हल्लीच्या मुलांची हीच व्यथा आहे
खरं प्रेम कोण करतं आणि खोटं कोण करतं
याचा थांगपत्ता आम्हाला लागत नाही
प्रेमामधलं आणि आकर्षणामधलं
फरक आम्हाला जाणवत नाही
अन् म्हणून आजकालचं प्रेम
आयुष्यभर साथ देऊ शकत नाही

अरे म्हणून म्हणतो मुलांनो, मनसोक्त प्रेम करा हीच तर वय आहे तुमची….
पण सर्वात आधी तुम्ही स्वतःच्या पायावर उभे रहा हीच गरज आहे काळाची…
प्रेमाने माणूस पोट भरू शकत नाही….
पण प्रेमाशिवाय माणूस जगू शकत नाही…….

Ektarfi prem kavita | प्रेमाची कविता मराठी | माझी प्रेम कहाणी

कवी आशु छाया प्रमोद (रावण)

आशु छाया प्रमोद (रावण)

तुम्हाला आमची आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा>>>>.

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा>>>>.

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *