emotional marathi poem

आयुष्यावर बोलू काही आणि माणुसकी | 2 Best emotional marathi poem

सौ. मेघना म्हात्रे आणि कु. उज्वला धांडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत emotional marathi poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

emotional marathi poem

काव्यबंध समूह आयोजित स्पर्धा

दिनांक- 1/10/2023

विषय – आयुष्य..

आयुष्यावर बोलू काही | emotional marathi poem

आयुष्यावर बोलू काही आणि माणुसकी | 2 Best emotional marathi poem

स्वैर ही जाई जीवन नौका
दाही दिशांनी
आशेची शृंखला कधी
ना पदांस सोडी
राहून गेले काहीतरी ते
भान न राही
आयुष्याचे कोडे कधी ही
सुटतच नाही…!!१!!

कशास इमले स्वप्नांचे
हे कोणासाठी
पडणारच होते का मग
ते का बांधीयले
असेच का असते हे उत्तर
मज ना उमगले
अडथळ्यांची ही शर्यत
कधीही संपत नाही…!!२!!

आठवणी ज्या मोरपंखी
त्या गतकाळाच्या
स्पर्श सुखद त्या रेशीम
ओल्या भावफुलांच्या
मैत्री ,स्नेह अन शब्दच
जपला माणुसकीचा
अंदाज कधी हा आप्तजनांचा
लागत नाही..!!३!!

क्षण एक लाभे जगून
घेई मन हे सांगे
कशास करिसी व्यर्थ तू
चिंता सूख हे भोगे
जीवनातल्या विवंचना या
कधी ना सुटे
चला आज मग
आयुष्यावर बोलू काही..!!४!!

सौ.मेघना म्हात्रे.अलिबाग…

emotional marathi poem

काव्यबंध समुह आयोजित कविता स्पर्धा
दिनांक: ०१/१०/२०२३
कवितेचा विषय:-आयुष्य

माणुसकी | emotional marathi poem

 माणुसकी | emotional marathi poem

कसे असते आयुष्य
विणलेल्या धाग्यासम
एक दोरा उसवला
सारा तुटला संगम (१)

आयुष्याच्या वाटेवर
काही अनुभव आले
मुखवटे लावलेले
काही चेहरे कळाले (२)

असा अनोखा प्रवास
मार्ग अखंड चालतो
श्वास पहिला अंतिम
दरी अंतर दावतो (३)

प्रत्येकाची धडपड
स्वतःसाठी आढळली
स्वार्थामागे धावताना
माणुसकी हरवली (४)

वेळ गेलेली माघारी
त्यात जगत बसतो
भूतकाळी वर्तुळात
फक्त चक्कर मारतो (५)

खरे जगणे कसले
कुणा न कोडे सुटले
जवळचे सौख्यक्षण
सांगा कुणी जोपासले (६)

जगताना भविष्याचा
थोडा विचार करावा
पूर्ण नाही थोडे तरी
दुसऱ्यांचा ठाव घ्यावा (७)

दुःख कुरवाळतांना
पर जाणीव असावी
संकटात दुबळ्यांशी
वाणी कठोर नसावी (८)

काळ वेळ परिस्थिती
सर्वांवर येणारच
उद्या नश्वर देहाची
राख गड्या होणारच (९)

अवघड वेळ येता
संकारात्मकता यावी
येता चिंतेचे सावटे
दूर पल्याड फेकावी (१०)

जगु हलके फुलके
काळ प्रत्येक सोसावा
अर्थहीन स्पर्धा नको
वर्तमान फुलवावा (११)

आम्ही आहोत पाठीशी
बळ द्यावे दुःखीतांना
खचतांना भाव त्यांचे
पंख द्यावे पामरांना (१२)

कु. उज्वला धांडे
नागपूर

 माणुसकी marathi kavita | emotional marathi poem

emotional marathi poem

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *