श्री. मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत emotional poem on aaji in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
emotional poem on aaji in marathi
काव्यबंध समूह आयोजित स्पर्धा
विषय -आजीची छकुली
दिनांक १४ सप्टेंबर २०२३
आजीची नातं emotional poem on aaji in marathi

मी माझी आजी पाहिली नाही
मी माझा आजोबा पाहिला नाही
मी पाहिली माझ्या पोरींची आजी
मी पाहिला माझ्या,
पोरींचा आजोबा
मी पाहिली माझ्या आईची नात
मी पाहिली माझ्या वडिलांची नात
मी पाहिलं तिला आजी, आजोबांच्या गोष्टी ऐकताना,
जागवताना आनंदी रात.
खायची आजीच्या हातून वरण भात.
आजीची नात, आजीची नात.
झोपवताना आजी नातीसाठी,
अंगाई गात.
नात मंग छान छान सपनात जात,
मंग आनंदी आनंद होई सारया
घरात.
पहिला घास नातीला भरवताना,
आजीचा आनंद गगनात असताना
त्या आनंदात आजीचच पोट भरून जाई.
आईची जागा आजीच घेई,
होऊन नातीची माई.
आजीची नात घरात
नाही तर
राही आजीच्या ह्रदयात.
प्रेम, आपुलकी, जिव्हाळा
आणि माया हे सारं मिळालं
आजीच्या संस्कारात.
उठताना सुर्याचा नमस्कार करावा
मोठ्यांना नमस्कार करावा
तुळशीला पाणी घालून,
नमस्कार करावा.
संध्याकाळी शुंभोगकरोती म्हणावी.
जेवताना वदनी कवळी म्हणावं.
हे सगळं शिकली आजीकडून,
आजीची नात.. आजीची नात.
श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे
देहू माळवाडी पुणे
emotional poem on aaji in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह