व्यक्तीमत्त्वाबाबत आपल्या समाजामध्ये बरेचसे समज गैरसमज आपल्याला पहावयास मिळतात. एखादी व्यक्ती चांगली दिसणं म्हणजे चांगलं व्यक्तिमत्त्व असे आपल्या समाजामध्ये धारणा आहे. परंतु असं नसतं. मित्रांनो व्यक्तिमत्व म्हणजे फक्त बाह्य गुण नसून तो माणसाच्या परिपूर्ण परिक्षणाचा प्रकार आहे. व्यक्तिमत्त्वाचे मुख्य असे तीन प्रकार पडतात. ते म्हणजे Introvert, Extrovert आणि Ambivert. या पैकी आपले कोणते व्यक्तीमत्व कोणते आहे ते पाहूया.
Extrovert, Introvert & Ambivert Meaning in Marathi
1) Introvert आंतरमुख in Marathi
Introvert म्हणजे आंतरमुख. एक आंतरमुख व्यक्ती नावाप्रमाणेच आपल्या स्वतःच्याच विश्वामध्ये रममान असणारे व्यक्ती. स्वतःच्या कल्पना विचारांमध्ये रममान होऊन आनंद शोधणारी व्यक्ती म्हणजे अंतर्मुख व्यक्ती. या व्यक्ती शांत एकांतप्रिय असतात. काहीजणांना त्या आतल्या गाठीच्या, ताठरवृत्तिच्या सुद्धा वाटतात. नियम, कल्पना, आदर्श यांना त्यांच्या जीवनात अती महत्त्व असते. तसेच नियम, आदर्शाचे हे लोक कटाक्षाने त्या पालन करत असतात. या व्यक्ती हळव्या असतात. त्या पटकन विश्वास ठेवतात. भावनाशील असल्यामुळे त्यांना शब्दांचे मोहजाल कळून येण्यास त्रास होतो आणि ते पटकन फसू शकतात. काही लोकांमध्ये असे दिसून येते की खूप फसवणूक अनुभवल्यामुळे ते संशयीवृत्तीचे बनले जातात. या व्यक्ती स्वमूल्यांकन व दिव्या स्वप्नामध्ये जास्त रमत असतात. तसेच सहसा या व्यक्ती सहानभूती शून्य किंवा सत्ता प्रतिष्ठेला महत्त्व देणारा असतात. तसेच या व्यक्तीमध्ये वाचनाची आवड असते. या व्यक्ती कलात्मक असतात. कोणत्यातरी कलेत ते निपुण होण्याचा प्रयत्न करतात.
Extrovert, Introvert & Ambivert Meaning in Marathi

2) Extrovert बहिर्मुख in Marathi
Extrovert म्हणजे बहिर्मुख. नावाप्रमाणे बहिर्मुख म्हणजे समाजात मिसळणारी व्यक्ती किंवा बाही परिवेशापासून सुख मिळवण्याची प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्ती. अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व हे बडबड असतं किंवा चार चौघात मिसळणार असतं. सभा समारंभामध्ये या व्यक्ती भाग घेत असतात. तसेच या व्यक्तींना थट्टा मस्करी करायला आवडत. तसेच या सहज समायोजन साधणाऱ्या व वास्तववादी असतात. तसेच दुसऱ्यांनी केलेले टीका यावर ते फारसा विचार करत नाही. आयुष्यातील अपयश पचविण्याची त्यांची क्षमता जास्त असते. तसेच ते स्वपरीक्षण करतात. ते दिवस स्वप्नांमध्ये या व्यक्ती क्वचित रममाण होतात. भावनिक दृष्ट्या ह्या व्यक्ती काहीश्या उदासीन असतात. त्यांना फार भावनिक परिस्थिती सांभाळता येत नाहीत.पण मित्रांना आणि कुटंबाला शाब्दिक आधार देण्याचे काम योग्यतेनुसार करू शकतात. शक्यतो अशा व्यक्ती क्रिडाप्रकारात आवड घेतात.
Introvert & Ambivert Extrovert Meaning in Marathi
3) Ambivert उभयमुखी in Marathi
Ambivert म्हणजे उभयमुखी. काही वेळेस अशा व्यक्तीमध्ये आपल्याला अंतरमुखी सोबत बहिर्मुख गुणवैशिष्ट्ये दिसून येतात. यालाच उभयमुखी असं म्हटलं जातं. जीवन जगत असताना या व्यक्ती फारच थोड्या सापडतात. कारण एक तर आपण अंतर्मुख असतो. किंवा बहिर्मुख असतो. पण या व्यक्ती परिस्थितीनुसार आपलं वर्तन हे बदलत असतात. म्हणजेच काही वेळेस. आपल्याला त्या व्यक्तींचा व्यक्तिमत्व अंतर्मुखी दिसत. त्या शांत राहतात स्वतःबद्दल विचार करतात. त्यांना एकांत आवडायला लागतो. तर काहीवेळा बहिरमुखी दिसून येतं. त्या समाजात मिसळतात. गप्पा गोष्टी करतात. गोष्टींमधून झालेला त्रास विसरून नव्या मार्गात मिसळतात.
Extrovert, Introvert & Ambivert Meaning in Marathi
तुम्हाला आमच्या या ब्लॉगवर जाऊन नवीन माहिती घ्यायला नक्की आवडेल—