Fasting Recipe : भगरीचा भात
साहित्य:
दोन वाट्या भगर, एक बटाटे, हिरवी मिरची चवीनुसार, मीठ चवीनुसार, शेंगदाणे
कृती:
१) प्रथम गॅस वर कढई ठेवावी, त्यात थोडे से पुरतेशेंगदाणे तेल गरम करून घ्यावे.
२) मिक्सरमध्ये शेंगदाणे हिरवी मिरची आणि मीठ टाकून जाडसर पेस्ट करून घ्यावी.
३) ही केलेली पेस्ट कडे टाकलेल्या तिला मध्ये परतून घ्यावी.
४) बटाटे बारीक चिरून घ्यावे, तेथे कढईतील मिश्रणा बरोबरपरतून घ्यावे
५) त्यानंतर कढईत चार ते पाच वाटी पाणी टाकावे.Fasting Recipe
६) कढईतील पाण्याला उकळी येईपर्यंत , भगर दुसऱ्या स्वच्छ पाण्यात धुऊन घ्यावी.
७) ही धुतलेली भगर कढईत टाकून घ्यावी.
८) आता 15 ते 20 मिनिटं गॅस मंद आचेवर ठेवून भगर शिजवून घ्यावी.
९) अशाप्रकारे आपली उपवासाची भगर तयार झाली.
——————————-
Fasting Recipe : शेंगदाण्याचे पिठले
साहित्य:
एक वाटी शेंगदाणे, हिरवी मिरची चवीनुसार, मीठ चवीनुसार, शेंगदाणे तेल
कृती:
१) प्रथम मिक्सर मधून शेंगदाणे, हिरवी मिरची ,मीठ , थोडेसे पाणी यांचे बारीक मिश्रण करून घ्यावे.
२) कढई शेंगदाणे तेल टाकून थोडेसे तापू द्यावे, त्यात वरील मिश्रण टाकून द्यावे व परतून घ्यावे.
३) शेवटी आपल्या अंदाजाप्रमाणे त्यात पाणी टाकावे व थोडा वेळ शिजवून द्यावे.
४) अशाप्रकारे आपले शेंगदाण्याचे पिठले तयार झाले आहे..
Fasting Recipe
साबुदाणा खिचडी

साहित्य: तीन वाटी साबुदाणा, उकडलेले बटाटे दोन ते तीन, चवीनुसार हिरवी मिरची व मीठ, शेंगदाणे, शेंगदाणे तेल
कृती:
१) प्रथम कढईत तेल गरम करून घ्यावे.
२) मिक्सरमध्ये शेंगदाणे हिरवी मिरची मीठ यांची जाडसर पेस्ट करून घ्यावी.
३) केलेली पेस्ट गरम तेलात परतून घ्यावी.
४) त्यानंतर त्यात भिजलेला साबूदाणा टाकून द्याव्या तो परतून घ्यावा.
५) त्यानंतर त्यात उकडलेले बटाटे टाकून द्यावे व ही सर्व खिचडी मिश्रण चांगले परतून घ्यावे.
६) अशाप्रकारे आपले चविष्ट उपासाची खिचडी तयार झाली आहे.
Fasting Recipe
Author – Mrs. Rupali
तुम्ही देखील ब्लॉग लिहू शकता. जर तुमच्या कडे तुमच्या स्वतःचे काही लेखन असेल व तुम्ही ते इंटरनेट वर टाकू इच्छित तर आम्हाला मेल करा. आम्ही कोणतेही मूल्य न घेता तुमचे लेखन आमच्या वेबसाईट वर प्रकाशित करू. – माझा ब्लॉग