माझा बाप | father hero poem

माझा बाप | best father hero poem in 2023

अब्दुल करीम शमशोद्दीन सय्यद यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत father hero poem विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

father hero poem

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका

दिनांक १५ /१० /२०२३.

विषय ~ वडील /बाबा/ पप्पा /बाप

माझा बाप | father hero poem

father hero poem

माझा बाप गरीब होता
मनाने मात्र गडगंज श्रीमंत
म्हणून तर गरिबीची मला
कधीच वाटली नाही खंत १

अठरा विश्व दारिद्र्याच्या घरी
जन्म त्याने घेतला होता
संयमाची त्याच्या परीक्षा घेण्या
देव सटवीला भेटला होता… २

लिही त्याच्या नशिबाचा फेरा
उसंत त्याला देवू नको
मी संयम दिला तू साडेसातीचा
अंत त्याला देवू नको. ३

आयुष्याच्या लढाईत माझा बाप
राब राब राबत राहीला
चारला आम्हास सोन्याचा घास
पण तो त्यान नाही पाहिला… ४

बनियन ला भोक चडीला ठिगळं
तुटकी चप्पल फुटक्या नशिबी
हसतच द्यायचा दिवसाला तोंड
देवानं परिक्षा पाहिली अशीबी.. ५

डोळ्यातले अश्रू डोळ्यातच लपवून
आमचे लाड पुरवत होता
शरिरात दुर्धर आजार घेऊन
बिना औषधानं मिरवत होता.. ६

लय मोठं करायचं पोराला
चंग त्यानं बांधला होता
आजार बळावून नियतीने पुन्हा
जीवावर निशाणा साधला होता.७

हिमालयासारखा माझा बाप
श्वासा गनिक मरताना पाहिला
शेवटच्या श्वासापर्यंत सुध्दा
आमच्या साठी झुरताना पाहिला ८

नजर त्याची शुन्यात होती
आलेली ती भिषण काळरात
मला प्रेमानं कुरवाळणाऱ्या बापानं
भगदाड पाडलं होतं काळजात.. ९

हातात हात घेऊन माझा
आयुष्याचं गणित सांगून गेला
धावपळ संपवत गाढ झोपला
जीव माझ्या हृदयात टांगून गेला १०

जर मिळाला मज पुन्हा जन्म मानसाचा
देवा बाप तोच हवाय मला
एका जन्मात कळालाच नाही
तुझी जागा देइन मी त्याला..११

अब्दुल करीम शमशोद्दीन सय्यद पंढरपूर
7038313235

father hero poem

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *