माझा बाप माझा अभिमान | Best father marathi poem in 2023

माझा बाप माझा अभिमान | Best father marathi poem in 2023

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत father marathi poem विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

father marathi poem

काव्य बंध समूह आयोजित काव्यलतिका
साप्ताहिक स्पर्धा.
दि१५/१०/२०२३.
विषय- बाप

माझा बाप माझा अभिमान | father marathi poem

वरून फणसासारखा काटेरी,
अंतरंगातून मधाळ गर,
कष्ट पडू दे कितीही,कार्यात,
शान वाढवी बापाचे घर….१

संकटे ,काळजी होती अफाट,
भविष्य जाणीले शिक्षणासाठी झगडले,
मुलाबरोबर, मुलींच्या ही स्वप्नांची,
दारे खुली करूनी दिले…२

बाप भविष्याचा मोठा दाता,
तरीही कर्तृत्वात नाही कसूर,
मुलांची स्वप्ने साकारण्या,
घेत नाही विश्रांती तसूभर…३

father marathi poem

father marathi poem

बापानेच दिला दृढनिश्चय,
चांगल्या गोष्टींचा दृष्टिकोन,
भरली मनात विश्वासाची ज्योत,
दिले मनातील इच्छा पूर्तिस्तव झोकून…४

मेहनत, चिकाटी शिवाय
माणूस होत नाही यशस्वी,
त्यांनीच भरला आत्मविश्वास,
म्हणूनच राहतो आनंदी मनस्वी…५

माझा बाप धन्यवान,
मुलांच्या सुखात मानतो मान,
करत‌ नाही कधीही तक्रार,
माझा बाप माझा अभिमान…६

नतमस्तक होते त्यांच्या,
चरणांशी लीन होऊन,
मिळू दे पुन्हा पुन्हा हा बाप,
जन्मोजन्मी कायम साथ राहून….७

मंगल राजाराम यादव.
शिराळा.जि.सांगली.

father marathi poem

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह