बाप माणूस | Best father poem on marathi in 2023

बाप माणूस | Best father poem on marathi in 2023

सौ. श्वेता मिलिंद देशपांडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत father poem on marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

father poem on marathi

📙📘 काव्यबंध समूह📗📕
आपल्यासाठी घेऊन आले आहेत
काव्यलतिका
प्रत्येक रविवारीय होणारी स्पर्धा

दिनांक:- १५/१०/२०२३

विषय :- वडील/ बाबा/ पप्पा/ बाप

स्पर्धेसाठी स्वरचित काव्यरचना

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

father poem on marathi

बाप माणूस | father poem on marathi

विचारले कोणी जरी
बघितला देव कधी?
झडकरी आठवण
होते बापाची ती आधी ||१||

ठाऊक आईची माया
बाप हा घराचा पाया
वटवृक्षासम मुलां
असे मजबूत छाया ||२||

कधी कधी रागवून
कधी कधी कौतुकाने
पैलू दिले हिऱ्यासम
दिली चकाकी प्रेमाने ||३||

father poem on marathi

बाप नावाचा फणस
दिसे काटेरी कठोर
गोड मऊ भावनांचा
मनात भाव विभोर ||४||

स्वतः आनंद त्यागून
रात्रं दिन कष्टतसे
कायम भविष्यासाठी
पदोपदी झटतसे ||५||

बाप होणे नाही सोपे
रक्ताचे पाणी करावे
येता संकटे कितीही
घरट्यास सदा जपावे ||६||

दमलेल्या बापाला कधी
विचारा त्याची कथा
उतरवयात थकल्यावर
बनू नका त्यांची व्यथा ||७||

बना आधार तेव्हा त्यांचा
जग दाखवले ज्यांनी
राहू ऋणात कायमच
माणूस बनवले त्यांनी ||८||

©® सौ.श्वेता मिलिंद देशपांडे
जामनगर, गुजरात

father poem on marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह