बाप नावाचं आभाळ | father we thank thee in marathi

बाप नावाचं आभाळ | Best poem father we thank thee in marathi in 2023

सौ. वैष्णवी परेश कुलकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत father we thank thee in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

father we thank thee in marathi

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका

दिनांक:- १५/१०/२०२३

विषय :- वडील/ बाबा/ पप्पा/ बाप

बाप नावाचं आभाळ | father we thank thee in marathi

father we thank thee in marathi

कळा सोसून जन्म देणारी आई साऱ्यांना उमगते पण बाप मात्र कळत नाही ,
उरातल्या जखमा दाबून हसणाऱ्या बापाला पाहून का कुणाचंच मन जळत नाही ?

मूल जन्माला येते तेव्हा फक्त आईच नाही तर बापही जन्मतो ,
स्वतःच्याच प्रतिरूपाला ओंजळीत घेताच त्याचा निष्काळजीपणा लोपतो..

त्याचा राग सगळयांना दिसतो पण हृदयाच्या तळापासून केलेली माया दिसत नाही ,
का कुणालाच त्या विना प्रार्थना पावणाऱ्या या देवाची महती कळत नाही ?

माझी नाही पण माझ्या काळजाच्या तुकड्यांची स्वप्न पूर्ण कर म्हणून सतत देवाला स्मरतो ,
लेकरू आजारी पडलं की आईपेक्षा बापच जास्त झुरतो…

१०० मागितले तर २०० देणाऱ्या बापाला देखील कसा हिशोब समजत नाही ,
का हो हा आपल्या आयुष्यातला कुबेर कुणालाच कळत नाही ?

बाप नावाच्या आभाळाखाली पहुडताच आत्मा सुखावून जातो ,
त्या आभाळात उमटलेलं भावनांचं इंद्रधनुष्य अनुभवताच जीव गलबलून जातो…

त्याच्या थरथरत्या हातांची अभिमानाची भाषा का कुणी वाचू शकत नाही ,
का हे आयुष्यातील संस्कारांचे विद्यापीठ कुणालाही उमगत नाही ?

वर्षानुवर्षे नसतो त्याच्या अंगाला झालेला नव्या कपड्यांचा स्पर्श ,
नवीन फॅशन वापरायला मिळाली म्हणून खुश झालेल्या पोरांना पाहूनच त्याला होतो हर्ष…
मुलांच्या ट्रीपसाठी पैसे लागतील म्हणून तो स्वतःची हौस पूर्ण करत नाही ,
त्यागमुर्ती आई साऱ्यांना दिसते पण सगळ्या सुखांपासून अलिप्त असा बाप समजत नाही…

लेकीला सासरी कमी पडू नये म्हणून अखंड धडपडतो ,
लेक सासरी निघते तेव्हा मात्र हा अचल पर्वत धाय मोकलून रडतो…
लेकाची परदेशवारी असो वा लेकीचे बाळंतपण , त्याच्या डोळ्याला डोळा लागत नाही,
खरंच ! बाप नावाचं रसायन कुणीही तयार करू शकत नाही…

बाप नावाच्या आभाळात नेहमीच असतो सप्तरंगांचा आविष्कार ,
कधी उमटे त्यात रागाची दामिनी तर अनेकदा होई उत्कट प्रेमाचा साक्षात्कार ,
सप्तरंगांचा हा शेला सोबत कायम असतो पण त्याचे अस्तित्व वळत नाही ,
रक्ताचं पाणी करून आपल्याच रक्ताच्या रोपांना वाढवणारा बाप सगळ्यांनाच कळत नाही….

©®सौ. वैष्णवी परेश कुळकर्णी नाशिक

father we thank thee in marathi

father we thank thee in marathi Poem Kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह