Father's Day 2023 Date Marathi Kavita | happy fathers day father marathi poem wishes kavita | बाबांसाठी कविता

Father’s Day 2023 Date & Marathi Kavita | बाबांसाठी सुंदर मराठी कविता

Father’s Day 2023 Date Marathi Kavita | happy fathers day father marathi poem wishes kavita | बाबांसाठी कविता
या वर्षी जागतिक पितृदिन म्हणजेच Father’s Day कधी आहे ते बघा आणि आपल्या वडिलांना आपल्या भावना आणि शुभेच्छा पोहोचवण्यासाठी पुढे दिलेल्या सुंदर कविता पाठवा.
Father’s Day 2023 >>> 18 June 2023
Father’s Day 2024 >>> 16 June 2024
Father’s Day 2025 >>> 15 June 2025
Father’s Day 2026 >>> 21 June 2026

कुटुंबातील नाते बाबांचे आणि मुलांचे ,
जणू स्नेहबंध गुलाबांचे आणि काट्यांचे

त्यांच्या जवळ असण्याची , कधीच किंमत कळत नाही
आणि दूर असल्यावर मात्र , दोघांनाही कधी करमत नाही

काटे आहेत सभोवताली म्हणून , अस्तित्व गुलाबांच आहे
बाबा आहेत जीवनात म्हणून , मुलाचं जीवन सुखात आहे…

कॉल किंवा विडिओ कॉल करून , त्याचं कधी भागत नाही
खूप भेटण्याची इच्छा असते , मात्र शिक्षणामुळे जमत नाही

आपल्या पासून लांब पाठवलं , पायावर उभं राहावं म्हणून
बाबांनी मुलांकडून केलेल्या , अपेक्षा पूर्ण कराव्यात म्हणून

Father’s Day 2023 Date Marathi Kavita | happy fathers day father marathi poem wishes kavita | बाबांसाठी कविता

त्यांच्या अपेक्षांना मुलं कधीच मातीमोल होऊ देणार नाही
म्हणून त्यांना शिक्षण सोडून , सारखं भेटायला यायला जमणार नाही…

इथल्या नव्या जगात आल्यावर कळलं , आमच्या एकट्याने कामे बरोबर होत नाही
खरचं बाबा तुमची फार आठवण येते , मात्र अभ्यासामुळे वेळ मिळत नाही….

घरी असतांना बाबा , पैशाचे महत्व कधी कळले नव्हते
कारण तेव्हा बाबा , तुम्ही आमचे पोकेट मनी संपू दिले नव्हते

पण इथे आल्यावर , एक एक पैशाचा हिशोब ठेवावा लागतो
महिना सरला की , रूमचा घर मालक दारात उभा असतो

स्वतः राब राब राबले , मात्र आम्हाला काम करू दिले नाही
इतके प्रेम कसे केले , याचाच निरंतर आम्ही विचार करतो

Father’s Day 2023 Marathi Kavita | happy fathers day father marathi poem wishes kavita

किती दिवस तुमच्या भरोशावर राहू ,
म्हणून म्हटले उरलेल्या वेळात कमवायला लागतो

असीम कष्ट तुम्हाला किती काळ देऊ ,
ओझे कमी होईल म्हणून ,पार्टटाइम कुठं तरी जॉबला लागतो

कामाचा अभ्यासावर परिणाम होणार नाही
काळजी करू नका बाबा खरचं मी तुम्हाला वचन देतो

पर्वतासारख्या विशाल खांद्यान्मागे
जबाबदारीचे त्याहून मोठे ओझे आता समजू लागलो

मला पाहून खुलणार्या हास्यामागे
समाधान आणि अपेक्षांचा पसारा आता शिकून घेतो

Father’s Day 2023 Date Marathi Kavita | happy fathers day father marathi poem wishes kavita

तुमची पाहिलेली स्वप्न अपूर्ण राहू देणार नाही
शिक्षण सर्व पूर्ण करून मोठ्या कंपनीत नोकरीला लागतो

ध्येयावरची नजर हटू देणार नाही
तुमचे नाव मोठे करण्यासाठी अविरत कष्ट घेतोय

बाबा तुमची नजर खाली पडू देणार नाही
माझ्याकडुन असलेल्या अपेक्षा पूर्ण करूनच मी घरी येतोय…..

कवी आशु छाया प्रमोद (रावण)

Father's Day 2023 Marathi Kavita | happy fathers day father marathi poem wishes kavita

बाप कविता | माझा बाप | Baap Kavita Marathi

वाचण्यासाठी क्लिक करा>>>>.रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता >>>>.

भीमसेनी कपूर कशासाठी वापरतात ?

बाबांवर निबंध वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *