बाप माझा | father's day poems for toddlers

बाप माझा | Best father’s day poems for toddlers in 2023

के. पी. बिराजदार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत father’s day poems for toddlers विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

father’s day poems for toddlers

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका
प्रत्येक रविवारची स्पर्धा
दि.१५.१०.२०२३
विषय:-वडील/बाबा/पप्पा/बाप

बाप माझा | father’s day poems for toddlers

father's day poems for toddlers

बाप माझा माझ्या जीवनाचा शिल्पकार
दिला मला माझ्या जगण्याला हा आकार
रात्रंदिन करून कष्ट आम्हा जगवला
जीवन जगावे कसे आम्हाला
शिकवला
कधी केली नाही स्वतःच्या देहाची पर्वा
सदा झिजला,भाजला,राबला
बेपर्वा
अन्न,वस्त्र,निवारा,शिक्षण पुरवला
कधी आम्हा कुणावर नाही
रागावला

सदैव हासत सदैव कामाला तयार
कधी बाप,कधी रक्षण कर्ता कधी यार
सारे पात्र एकटाच एकट्याने करायचा
सर्वांच्या गरजा,समस्या, दुर करायचा
कधी बघीतली नाही स्वतःची चप्पल
कधी केली नाही खोटी संसाराची नक्कल
सर्वांच्या आजारात कधी थांबला नाही
स्वतः प्रकृती,आजार कधी पाहिला नाही
घराचा छप्पर तो घराचा आधार तोच
मनात कुणाबद्दल ठेवली नाही खोच
संसारासाठी सावकाराला पसरले हात
घराची संकटात सोडली नाही साथ
बापाच्या डोळ्यात कधी दिसले ना अश्रु
ना कधी कुणासमोर अश्रु गाळला नाही
तोंड दाबुन बुक्क्यांचा मार स्वतः
खायचा

अंधारात डोळ्यांना अश्रुंत भिजवायचा
रात्र तिची या कुशीवरून त्या कुशीवर
एकटाच बघायचा छताला उशीवर
ऊन,वारा,पाऊस,थंडी हे त्याचे सोबती
संघर्ष,अपमान,लाचारी हि त्याची पनौती
घर सांभाळन पालन-पोषण एवढच
त्या सुरक्षित,सन्मानित ठेवणं
एवढच
बापाला कुणी ओळखत शकल नाही
स्वतःसाठी आयुष्यात कधी जगला नाही
नऊ महिने गर्भवासात आईने पोसले
आयुष्यभर बापाने बंडाळ
सोसले

के.पी.बिराजदार
तुरोरी(धाराशिव)

father’s day poems for toddlers

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *