First Love Marathi Kavita

पहिल्या प्रेमाची कथा | माझे पहिले प्रेम | First Love Marathi Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी गौरव जगन्नाथ गागरे यांची -पहिल्या प्रेमाची कथा- हि एक First Love Marathi Kavita आहे

पहिल्या प्रेमाची कथा | First Love Marathi Kavita

पहिल्या प्रेमाची कथा | माझे पहिले प्रेम | First Love Marathi Kavita 2023

जेव्हा आठवतो मी तिला
तेव्हा जागी होते माझ्या मनातील व्यथा ,
आठवते तिचे ते गोजरे स्वरूप
आणि आमची ती प्रेमाची कथा.

शाळेतली आमची पहिली भेट
मला अजूनही आठवते,
तिची सुंदर स्माईल मनाला
आतून अजूनही हसवते.



माझा पहिला दिवस शाळेतला
आणि सर्वात पहिले मी तिलाच पाहिले ,
आणि पाहताच तिला माझं
तिच्यावरच प्रेम जडले.

दिसायला जरी होती सावळी ती
तिचा स्वभाव खूप छान होता,
की याचमुळे तिला माझ्यापेक्षा
वर्गात जास्त मान होता.



मी वर्गात पहिला यायचो
तिचाही दुसरा येत असे,
ती मला अभिनंदन म्हटल्यावर
माझं मन गगन भरारी करत असे.

दोघेही हुशार असल्यामुळे आम्ही
सोबतच अभ्यास करायचो,
ती मला शंका विचारत रहायची
मी तिच्याकडे बघत बसायचो.



टेन्शन मधला चेहरा तिचा
खूप सुंदर दिसायचा ,
पण मी उत्तर न सांगितल्यावर
तिचा माझ्या पाठीत बुक्का बसायचा.

तिच्या बुक्क्याच्या वेदना
मला खूप छान लागायच्या ,
बुक्की बसायची पाठीवर आणि
हृदयात गुदगुल्या व्हायच्या.



बुक्की हाणल्यावर माझ्यापुढे
ती प्रश्नांची वही जोरात आदळायची ,
तेव्हा कुठे माझा तिच्या सौंदर्याच्या
भुरळीतून सुटका व्हायची.

सोबतच्या अभ्यासामुळे आमची
आता मैत्री छान वाढली होती,
आणि हळुवार या मैत्रीची जागा
कुठेतरी प्रेमानही घेतली होती.



नववीचा निकालाचा तो दिवस
माझ्यासाठी अविस्मरणीय होता ,
कारण त्याच दिवशी तिने
माझ्यासमोर प्रेमाचा प्रस्ताव मांडला होता.

एकतर्फी प्रेम माझं आता
दुतर्फी झालं होतं,
प्रेमाच्या नजरेने मी तिच्याकडे नाही
तर तिने माझ्याकडे पाहिलं होतं.



दहावीची सुरुवात
प्रेम गंधात मोहून झाली होती,
या काळात फक्त मी तिच्यासाठी
आणि ती माझ्यासाठी होती.

एका लॉलीपॉप च्या बळावर तिचा भाऊ
माझी चिठ्ठी तिच्यापर्यंत पोहोच करायचा,
अन तीन लिहिलेलं उत्तरही तो
माझ्यासाठी वापस घेऊन यायचा.



माझ्या कवी मन तिच्यासाठी आता
कविता लिहू लागलं होतं,
कविता लिहिताना मनामध्ये
भविष्यातील स्वप्न रंगवत चाललं होतं.

माझ्या सहवासात राहून ती
आता काही ना काही लिहू लागली होती ,
लिहिलेलं मला वाचून दाखवताना
मधेमध्येच खूप सुंदर लागत होती.



आमच्या प्रेम संबंधाने
एक खूप सुंदर गोष्ट घडली होती,
ती आता ह्या कवीपेक्षा सुद्धा
उत्तम कवयित्री झाली होती.

कवितांच्या या स्पर्धेमध्ये
दहावीचे प्रथम सत्र कधी आलं कळलच नाही,
अचानक आलेल्या परीक्षेत
आम्हाला दोघांनाही काही जमलच नाही .



घसरलेला निकाल घेऊन जेव्हा
ती माझ्याकडे आली,
तेव्हा मी तिला बोर्डाचा निकाल चांगला येईल अशी समजूत देऊ केली.

तिने हे समजून घेण्याचा जरासा
प्रयत्नही केला नाही ,
उलट तीनच मला सांगितलं
आता बस झालं सर्व काही.



ती असं बोलल्यावर
माझं डोकं पार भांबावून गेलं,
नकळत माझ्या डोळ्यातून
जरा पाणी बाहेर आलं.

तेव्हा सारखा आताही
डोळ्यातून पाणी बाहेर आलं आहे,
वीस वर्षांपूर्वीच्या कथेचा
अजूनही तेवढाच तीव्र चटका बसत आहे..

पहिल्या प्रेमाची कथा | First Love Marathi Kavita

पहिल्या प्रेमाची कथा

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

पहिल्या प्रेमाची कथा | First Love Marathi Kavita

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
33 ⁄ 11 =