Flower Information in Marathi

फुलाबद्दल संपूर्ण माहिती | Flower Information in Marathi Best 600 शब्द

आजूबाजूला मन आकर्षित करणार हे फुल किती उपयोगी आहे आणि संपूर्ण माहिती घेण्यासाठी वाचा Flower Information in Marathi त्यासोबतच वाचा फुल आणि त्याचे संपूर्ण प्रकार.


खूप पूर्वीपासून वापरण्यात येत असलेलं हे फुल, या फुलाला सर्व जग परिचित आहे. दिसायला सुंदर, मनमोहक आणि प्रत्येकाचे मन जिंकून घेणार ,स्वतःच्या सुगंधाने वाईट सुगंध मिटवणारा हा फुल. खरंतर प्रत्येकालाच खूप आवडत असते काही वेळासाठी का होईना पण मनाला हृदयाला आनंद देणारा हे फुल असते या फुलांच देखील एक वेगळ आयुष्य असत. हे तुम्हाला माहिती होतं का?

Flower Information in Marathi

फुलाबद्दल संपूर्ण माहिती | Flower Information in Marathi Best 600 शब्द

फुलांचा अर्थ

फुलांचा नेमका अर्थ काय हे जाणणे अतिशय कठीण असते.हा प्रकारानुसार बदलत असतो खरंतर या फुल या शब्दाचा हजारो अर्थ आहेत पण आपण त्याला मुख्य अर्थ सांगू शकत नाही.
फुल तोडून देवाच्या चरणी अर्पण करणे आणि फुलाचा सुंदर गुच्छ तयार करून एखाद्याला भेट देणे इतकच नाही तर फुलाचा गजरा बनवून केसात माळणे ही आपली भारतीय संस्कृतीच म्हणायची.

आपल्या आजूबाजूच्या परिसरात आढळणारे फुल आणि त्याची संपूर्ण माहिती.

फुलाबद्दल संपूर्ण माहिती | Flower Information in Marathi Best 600 शब्द

गुलाब

गुलाब प्रेमाचा प्रतीक आहे आणि जगभरात प्रसिद्ध आहे त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते मुल प्रपोज करण्यासाठी गुलाबाचाच वापर करतात गुलाबाचे फुल हे देखील रंगांमध्ये उपलब्ध असते गुलाबाचे फुल लाल पिवळे आणि पांढऱ्या रंगाचे आपल्याला आढळून येते.

फुलाबद्दल संपूर्ण माहिती | Flower Information in Marathi Best 600 शब्द


Mpsc syllabus and my success story by तहसीलदार संतोष आठरे

कॉम्पुटर ची महत्वाची माहिती | Best Computer Information In Marathi 2023


कमळ

कमळ हे सर्वांना परिचित असेल भारताच राष्ट्रीय फूल म्हणजे कमळ. कमळ हे चिखलामध्ये दलदलीच्या भागात वाढतात, इतकच नाही तर माता लक्ष्मी हे या फुलाला आसन म्हणून नेहमी या फुलावर विराजमान असताना दिसतात. म्हणून हिंदू धर्मामध्ये या फुलाला अनन्य साधारण महत्त्व आहे ,आणि हे फुल पवित्र मानले जाते.

झेंडूच्या फुलाचा रंग पिवळा असतो.  झेंडूला फुलांचा गुच्छ असेही म्हटले जाऊ शकते कारण त्याच्या फुलाची प्रत्येक पाकळी स्वतः एक फूल असते.

झेंडू

आपल्याला सगळीकडे आढळून येणारे झेंडूचे फुल, या फुलाचा रंग पिवळा असतो. झेंडू फुल हे देवावर वाहिले जाते .आणि झेंडू फुलाची ही प्रत्येक पाकळी स्वतःच एक फुल असते ही या फुलाची वैशिष्ट्य आहे.

सूर्यफुल

सूर्यफुलाला सर्वात महत्त्वाचे सूर्यफूल म्हणण्याचे कारण आज तुम्ही जाणून घेत आहात .या फुलाची टेशन सूर्यप्रमाने बदलत जाते ज्याप्रमाणे सूर्य पूर्वे ला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. त्याचप्रमाणे जसा सूर्य फिरतो ,तसेच या फुलाची दिशा देखील बदलत असते .म्हणून याला सूर्यफूल असे म्हणतात.

फुलाबद्दल संपूर्ण माहिती | Flower Information in Marathi Best 600 शब्द

चाफा

आता आपण जाणून घेणार आहोत चाफ्याच्या फुलाबद्दल. हे दिसायला खूपच सुंदर आणि मनमोहक असते. या फुलाला सुगंध देखील खूपच सूवासिक असतो. इंग्रजीमध्ये चाफ्याला आपण प्लूमेरिया असे म्हणतो. चाफ्याचे फुल हे वेगवेगळे रंगांमध्ये आणि वेगवेगळ्या वेरायटीमध्ये आपल्याला दिसतात पांढऱ्या रंगाचा जो चाफा असतो त्याला सोनचाफा देखील म्हणतात.
सोन चंपा, नाग चंपा, कनक चंपा, सुलतान चंपा कथारी चंपा.
चाफ्याचे वेगवेगळे प्रकार आहे आहेत. त्यापैकी सोन चंपा, नाग चंपा, कनक चंपा ,सुलतान चंपा कथारी चंपा. इत्यादी आपल्या आजूबाजूला आढळणारी ही फुले असतात. शिव शंकर भोलेनाथ यांना चाफा फुल खूप आवडतो म्हणून या फुलाची खूप जास्त प्रमाणात खरेदी केली जाते. शिवशंभूच्या चरणी अर्पण केली जाते.

जास्वंदाचे फुल

जास्वंद फुल नाव जसे त्याचे वेगळे आहेत, तसेच माझ्या गणपतीला देखील आवडणार हे फुल आहे. या फुलाला इंग्रजी मध्ये हिबिस्कस या नावाने ओळखले जाते. संस्कृत मध्ये जास्वंदीला आणि गुजरात मध्ये जासूद या नावाने ओळखले जाते या फुलाला वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या प्रदेशात ओळखले जाते .
जास्वंद फुल जसे गणपतीची आवडते आहे. तसेच या फुलाचा आयुर्वेदामध्ये देखील अनेक आजारांसाठी उपयोग केला जातो. इतकच नाही तर जास्वंदीचे झाड हे मुख्यता झुडपा मध्ये आढळून येते. हे फुल लाल ,पांढरा ,गुलाबी ,पिवळ्या ,केशरी या विविध रंगांमध्ये आपल्याला आजूबाजूला आढळून येताना दिसतो.

फुलाबद्दल संपूर्ण माहिती | Flower Information in Marathi Best 600 शब्द

फुलांचे उपयोग

१)खरंतर फुल हे फुल विकणाऱ्यांच्या जीवनाचा एक अनमोल साधन असते. तो फुल विकून स्वतःच घर चालवतो इतकच नाही तर या फुलाचे असंख्य फायदे आहेत.

२)फुलाचा उपयोग घराला सुंदर सजावट करण्यासाठी, हॉटेलमध्ये सजावट करण्यासाठी ,आणि इतर कुठल्याही ठिकाणी आकर्षक दिसण्यासाठी केला जातो.

३)इतकच नाही तर फुलाला केसांमध्ये माळण्यासाठी त्याचा गजरा बनवण्यासाठी, देवाला चरणी अर्पण करण्यासाठी ,आणि प्रियसीला देण्यासाठी देखील या फुलाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.

४)काही वेळा या फुलाचा उपयोग कॉस्मेटिक वस्तूंमध्ये केला जातो.जसे, की गुलाब जल चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी या फुलाचा उपयोग केला जातो

५) काही आजार उपचारांसाठी या फुलाचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.

फुलाबद्दल संपूर्ण माहिती | Flower Information in Marathi Best 600 शब्द

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *