Food Safety Display Board- अन्न सुरक्षा दर्शक फलक

Food Safety Display Board- अन्न सुरक्षा दर्शक फलक

Food Safety

प्रत्येक अन्न व्यवसायाच्या आवारात fssai license क्रमांक लावणे अनिवार्य आहे. आपण जेंव्हा ग्राहक म्हणून  दर्शक फलक अन्न व्यवसायाच्या परिसरात लावला आहे कि नाही ते पाहणे अगत्याचे आहे. सहसा हा क्रमांक किंवा fssai license प्रमाणपत्र हे अशा भागात लावले जाते की तिथून ग्राहकाला अन्न व्यवसायाचा license क्रमांक व्यवस्थित दिसत नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी fssai अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने पुढाकार  प्राधिकरणाने पुढाकार घेत food safety display board अर्थात अन्न सुरक्षा दर्शक फलकांची निर्मिती केली आहे. हे फलक fssai च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तसेच लिंक लेखाच्या  आहे. 

अन्न सुरक्षा दर्शक फलक हे विविध व्यवसायांकरिता  प्रसिद्ध केलेले आहेत. 
पुढे अशा व्यवसायांची यादी दिली आहे.१. किरकोळ विक्रेते,२. दूध विक्रेते,३. फळे व भाजीपाला विक्रेते,४. मांस विक्रेते,५.उपाहारगृहे,  ६.  साठवणूक गोडाऊन,७. अन्न वाहतूक,८.मद्य दुकाने, ९. छोटे अन्न व्यावसायिक (रस्त्यावरील)१०.अन्न प्रकिया उद्योग 11. आईस्क्रीम विक्री हातगाडी 12. कोविद १९ संबंधित सूचना

Food Safety Display Board- अन्न सुरक्षा दर्शक फलक वैशिट्ये       

अन्न सुरक्षा दर्शक फलक सध्या इंग्रजी मध्ये असून येत्या काळात इतर भाषांमध्ये उपलब्ध होईल. 

या फलकाची वैशिट्ये – 

  • १. fssai परवाना क्रमांक 
  • २. अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या महत्त्वाच्या सवयी (कृती)
  • ३. अन्न व्यवसायाचा संपर्क क्रमांक व अभिप्राय नोंदवण्यासाठीची सूचनावजा माहिती.


        अन्न व्यावसायिकांनी परवाना लावण्याऐवजी हे फलक लावावेत. यामुळे परवान्यातील लहान अक्षराची  होईल आणि ग्राहक, व्यावसायिक व प्रशासन यांना समन्वय साधता येईल. या उपायामुळे व्यावसायिक, ग्राहक तसेच अन्न हाताळणी कर्मचारी यांची अन्न सुरक्षेची जबाबदारी वाढेल. कारण या फलकावर fssai चा केंदीय  तक्रार निवारण क्रमांक दिलेला आहे, तसेच food safety connect या मोबाइल app ची पण माहिती दिलेली आहे. प्रत्येक सुरक्षा सवयीला एक विशिष्ट क्रमांक  आला  आहे जेणेकरून अभिप्राय  तक्रार नोंदवताना अधिक स्पष्टता येते. या app मध्ये प्रत्येक व्यवसायासाठीचा देण्यात आला आहे. हा फलक open design format मध्ये दिलेला असल्या मुले यात  व्यवसायाशी निगडित बदल करता येऊ शकतात. अन्न व औषध प्रशासन, fssai, अन्न व्यावसायिक याना हे अभिप्राय / तक्रार शेअर केले जाते.पहिल्या टप्प्यात हे फलक स्वयंप्रेरणेने व्यावसायिकांनी अंगिकारावेत. नंतरच्या टप्प्यात असे फलक लावणे हि एक बाब करण्यात येईल असे  सांगते. 

Food Safety Display Board- अन्न सुरक्षा दर्शक फलक

अन्न सुरक्षा दर्शक फलक लावताना लक्षात ठेवण्याच्या  सूचना

  • आपला अन्न व्यवसायाचा प्रकार आणि त्याच्याशी संबंधित फलक यांची शहानिशा करूनच फलक लावावा.
  • नोंदणीकृत व्यवसायांसाठी A4 हि साईझ.
  • परवानाधारक व्यवसायांसाठी A3 हि साईझ
  • कमीत कमी एक फलक लावणे अनिवार्य आहे. अधिक फलक लावू शकता.
  • फलकावरील माहिती अस्प्ष्ट होणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • परवाना किंवा नोंदणी क्रमांक सर्वात वरच्या जागेत तर कंपनीचे नाव व संपर्क क्रमांक सर्वात खाली उजव्याबाजूला द्यावा. याकरिता जागा देण्यात आली आहे.

अन्न सुरक्षा दर्शक फलक डाउनलोड करण्यासाठी https://fssai.gov.in/cms/food-safety-display-boards.php या लिंक वर जाऊ शकता. अथवा आपल्या जवळच्या अन्न सुरक्षा मित्राशी संपर्क साधू शकता.

Author-संकेत अहंकारी 

सर्टिफाइड फूड सेफ्टी मित्र
FSM ID FSMDM003155
Contact- ८६२३८५५८३३
Email- foodsafetymitra@yahoo.com

Food Safety Display Board- अन्न सुरक्षा दर्शक फलक

CLICK FOR FSSAI License- Login, Register, Full form: अन्न सुरक्षा परवाना- प्रक्रिया व फायदे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *