Fort of Maharashtra

Fort of Maharashtra – Manjarsumbha Fort

Fort of Maharashtra- Manjarsumbha. इतिहासाची साक्ष देणारा मांजरसुबा किल्ला.


अहमदनगर शहरापासून केवळ 21 किलोमीटर अंतरावर मांजरसुबा नावाचा सुंदर किल्ला आहे. जसे हरिश्चंद्रगड, भुईकोट असे सुपरिचित किल्ले आहेत. तसेच मांजरसुबा सारखे अनेक छोटे छोटे आणि अपरिचित किल्ले देखील या भागामध्ये पाहण्यास मिळतील. पूर्वीच्या काळामध्ये गडाखालून जाणाऱ्या वांबोरी घाटावर संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधला होता. या ठिकाणी पायऱ्यापासून ते गडावर जाण्यासाठी प्रशस्त अशी वाट दिसते, पण गाडी गडावर जाऊ शकत नाही. 15 ते 20 मिनिटे गडावरती पोचण्यासाठी कालावधी लागतो. सर्वप्रथम आपण मुख्य दरवाज्यापाशी आल्यानंतर गडाच्या दक्षिणेस असलेल्या दिशेकडे जाताना भक्कम बांधणीचा दरवाजा पाहून खरंच आश्चर्य वाटते. येथे बांधकाम मजबूत असून त्याच्या बाहेरील बाजूस सैनिकाच्या देवड्या बघायला मिळतात. या किल्ल्याची रचना काही प्रमाणात वेगळी आहे. प्रवेशद्वाराचे बांधकाम चौरसाकृती असून आतमध्ये सैनिकांना राहण्यासाठी दालने आणि त्या दालनयांना सुरेख अशी झरोके पण पर्यटकांना पाहण्यासाठी आणि आतील कमाने व छताचे बांधकाम खरोखर पाहण्यासारखे आहे. दरवाजातून आत गेल्यावर समोरच राजवाड्याचे अवशेष दिसतात. तेथे जाण्यासाठी प्रशस्त अशा पायऱ्यासुद्धा बघण्यासाठी आहेत .लांबून पर्यटक हे ठिकाण पाहण्यासाठी येतात. ….Fort of MaharashtraManjarsumbha

Fort of Maharashtra

वाडा जरी जुना आणि मोडीला आला असूनसुद्धा अजून पण निजामशाहीच्या ऐश्वर्य संपन्न साम्राज्याची साक्ष देत असल्याचे दिसते. येथील एक गोष्ट मात्र खरंच नमूद करावशी वाटते की, येथे पडलेला जो लाल दगड दिसतो तो सहजासहजी महाराष्ट्रामध्ये आढळत नाही. इतिहास कारक असे म्हणतात की, हा दगड खास राजस्थानवरुन गडाच्या बांधकाम साठी आणला असावा. पुढे गेल्यानंतर वाड्याच्या समोरच भला-मोठा रुंद आकाराचा हाऊद आहे, त्याची खोली साधारणपणे 6 फूट इतकी असावी. बहुदा हा जलतरंग सुद्धा असेल. गडावर उभे राहिल्यानंतर सभोवतालच्या परिसराचे बारीक निरीक्षण केल्यावर समोरच दूर अंतरावर असलेला गोरक्षगड म्हणजे गोरक्षनाथाचे सुंदर असे मंदिर त्या ठिकाणी आहे. राजवाड्यांच्या थोड पुढे आल्यावर भक्कम बांधणीचा दुमजली बुरुज व खाली उतरण्यासाठी जिना-सुद्धा आकर्षित करतो. येथील दगडी बांधकाम आणि कला अगदी वैशिष्ट्यपूर्ण असून त्यातील आत मध्ये असलेल्या प्रशस्त अशा खोल्या सुंदर दिसतात. समोरच दिसणारा एक नजरा खरंच नाविन्यपूर्ण पाहण्यासाठी आहे . परंतु या, बुरुजाच्या थोडे पुढे गेल्यावर कमानीचा दरवाजा येतो. त्यापासून पुढे जाण्यासाठी पायऱ्यांची वाट पण बऱ्याच ठिकाणी दगडे पडल्या असल्याकारणाने जाताना जरा सावधान जावे. चालत असताने पुढे 4 ते 5 पाण्याच्या टाक्या आढळतात. परंतु सर्व टाक्यामध्ये गाळ साचल्याने कारणाने पाणी पिण्यासाठी योग्य नाही असे समजते. किल्ला चढण्यासाठी 20 मिनिटे लागतात. सर्व माहिती घेण्यासाठी 1:50 तास पुरेसा आहे. या स्थळी निजामशाही कालीन वास्तूचे बरेच अवशेष या किल्ल्यावरती पाहायला मिळतात. अहमदनगर मध्ये शहरामध्ये मुक्काम करून मांजरसुबा किल्ल्या सोबत भुईकोट किल्ला, रणगाडा म्युझियम, सलाबत खानची कबर (चांदबिबीचा महाल ) आणि हत्ती बारव अशी ऐतिहासिक ठिकाणे पाहता येतील.

मांजरसुम्भा येथील किल्ल्याचे व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लीक करा.

राजगड ट्रेक बद्दल वाचा.

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
33 ⁄ 11 =