Friend Birthday Shayari in Marathi

Friend Birthday Shayari Marathi | मित्रासाठी वाढदिवस मराठी शायरी

आपल्या आवडत्या मित्राचा वाढदिवस आणि आपण फक्त “Happy Birthday Bro” असा गुळमुळीत मेसेज टाकणे म्हणजे एकदम चुकीचे आहे. चला बघूया Friend Birthday Shayari in Marathi | मित्रासाठी वाढदिवस मराठी शायरी . तुम्हाला आवडेल अशा शायरी निवडा आणि जरा हटके पद्धतीने मित्राला Wish करा.

Friend Birthday Shayari in Marathi | मित्रासाठी वाढदिवस मराठी शायरी

वाढदिवस तुझा असला
तरी खास माझा दिवस आहे
तुझ्यासारखा सखा जन्मला
तोच आजचा दिवस आहे

तुझा वाढदिवस म्हणजे
जणू अनमोल ठेवा आहे
तुझ्या सोबत घालवलेला हा क्षण
जणू माझ्यासाठी एक मेवा आहे

तुझ्या वाढदिवसा निमित्त
तुझे सारे स्वप्न पूर्ण व्हावेत
एकच देवाकडे प्रार्थना मागतो
तुझे आयुष्य आनंदाने संपूर्ण व्हावेत

Friend Birthday Shayari in Marathi | मित्रासाठी वाढदिवस मराठी शायरी | Happy Birthday Shayari

केकवर लावलेल्या मेणबत्त्या
असेच जळू दे
आणि तुझ्या वाढदिवसानिमित्त
मेणबत्या सोबत तुझे दुःख ही जळू दे

वर्षाचे सर्वच दिवस
आठवणीत राहत नाही…
पण काही दिवस
विसरताही येत नाही….
त्यातलाच एक
तुझा वाढदिवस आहे….
जो नेहमी स्मरणात राहतो
एवढा खास आहे…

सूर्यासम तेज आणि
चंद्रासम प्रकाश मंद आहे
वाऱ्यासवे पसरलेला
हा एक नवा गंध आहे
तुझा वाढदिवस साजरा करणे
जणू हा माझा एक छंद आहे…

Friend Birthday Shayari in Marathi | मित्रासाठी वाढदिवस मराठी शायरी | Happy Birthday Shayari

Friend Birthday Shayari in Marathi | मित्रासाठी वाढदिवस मराठी शायरी | Happy Birthday Shayari

वड वृक्षाप्रमाणे
तुझं आयुष्य वाढत राहो…
रातराणी प्रमाणे
सुगंध दरवळत राहो
चमचमणाऱ्या जुगणू प्रमाणे
तुझं ही आयुष्य चमकत राहो
ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे
की तुझ्या चेहऱ्यावर सदा हास्य उमटत राहो…
या वाढदिवसानिमित्त तुला
असेच भरभरून भेटवस्तू मिळत राहो….

गौतम बुद्धांची शांती
आणि शिवरायांचं शौर्य लाभो
जिजाऊचरणी प्रार्थना आहे
तुला वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्य लाभो…

लोकं येतात जातात
कुणी रडवतात
तर कुणी हसवतात
पण तुमच्यासारखी माणसे
प्रत्येकाला मिळत नसतात
म्हणून मी स्वतःला
नशीबवान समजतो
आणि तुम्हाला तुमच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो….

Friend Birthday Shayari in Marathi | मित्रासाठी वाढदिवस मराठी शायरी | Happy Birthday Shayari

तुझ्यासाठी भेटवस्तू काय घ्यावी
हा विचार मनात आला
सगळी दुकानं पालथी घातली पण
तुझ्या तोडीस तोड नाही मिळाला
एका गुलाबाच्या फुलाकडे बघितलो
आणि तुझा विचार डोक्यात आला
सतत इतरांच्या आयुष्यात सुगंध
दरवळणाऱ्या मित्रा भेट म्हणून हा गुलाब तुला
या गुलाबसारखं सतत प्रफुल्लित राहत जा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला…

DJ च्या तालावर नाचून चला भावा
तुझा वाढदिवस साजरा करूया
अन् तुला भरपूर शुभेच्छा देऊन
चल भावा आजचा दिवस खास बनवूया…

मित्र नाहीस तू माझा भाऊ आहेस
सख्खा नसला तर परका नाहीस
अरे रक्ताचे नाते सुद्धा विसरून जातात
पण तू कधी आम्हा विसरला नाहीस
मित्रा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तू सतत हसत राहोस हीच मनोमन इच्छा…..

Friend Birthday Shayari in Marathi | मित्रासाठी वाढदिवस मराठी शायरी | Happy Birthday Shayari

भेटवस्तू देऊ शकलो नाही मित्रा
पण शुभेच्छा मनापासून देतो
तुझ्या वाढदिवसाचा हा अनमोल क्षण
न जावो हीच प्रार्थना मनापासून करतो….
Happy Birthday…..

वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज वाचण्यासाठी क्लिक करा.

Read Diwali शुभेच्छा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *