काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी कुमारी.Kashmira Ulhas Gupte यांची -मैत्री ही जगावेगळी – हि कविता -Friend Poem Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
मैत्री ही जगावेगळी By कु. Kashmira Ulhas Gupte | Best Friend Poem Marathi 2023
मैत्री ही जगावेगळी | Friend Poem Marathi 2023

तुझी माझी मैत्री
ही आहे जगावेगळी
स्पर्धेच्या युगातील
आपलीही वाटणारी
मैत्री अर्थ मोठा
शब्द मात्र लहान
दोघांतील ही मैत्री
तुझी माझी मैत्री
लहान सहान गोष्टी
आनंद देणारी
दुःख कष्ट
वाटून घेणारी
समस्या सोडणारी
तुझी माझी मैत्री
मैत्रीत आहे गोडवा
आहे मोठा विश्वास
मैत्री म्हणजे
नवं नातं निर्माण करणारे
आकाशी झेप घेणारे
मैत्री म्हणजे सोबत
समुद्राच्या लाटेप्रमाणे
प्रवाहात वाहणारे
कधीही न संपणारी
तुझी माझी मैत्री
मैत्री ही गोड आठवण
तिजोरीत जमली साठवण
आयुष्याच्या टप्प्यात
वेळोवेळी मार्गदर्शन करणारी
तुझी माझी मैत्री
माझी मैत्री म्हणजे
मैत्रीण तु आई
जन्मोजन्मी साथ देणारी
आईसारखी मैत्रीण
मिळणे नशीब बलवत्तर
तुझी माझी मैत्री
मैत्री केली तु
मी पोटी असताना
संघर्षातून जन्म दिला
कष्ट केले तु तेव्हा
असेल जेव्हा मला
गरज तु दिली साथ
तुला वाटली हवी
साथ ही माझी
दिली साथ मी तुला
सांगितले नाही
तरी कळेल संकटात
आहेस तू मैत्रीण
धावून येई वाऱ्यासह
ही आहे जगावेगळी मैत्री
गोष्टीत वाचले मी एकदा
मैत्री ही काहीही करू शकते
आजवर हे अनुभवले
चुकले कधी मी
तेव्हा सांगते तु मला
समजून घेऊन
समजावते मला
तुझी माझी मैत्री
ही इंद्रधनुष्यासारखी
रंग बहणारी
नात्यात संवाद साधणारी
कधी गोड जिलेबीसारखी
तर कधी तुरट आवळासारखी
तुझी माझी मैत्री
ही आहे जगावेगळी
मैत्री म्हणजे
शुध्द व प्रेमळ नातं
त्याग समर्पण भावनेने
जपलेली मैत्री
मैत्रीत आहे
रुसवा फुगवा
राग लोभ मोह मत्सर
जगा नाही मैत्रीत
मैत्रीत आहे आपुलकी
माणुसकी जागी करणारी
समजुतीने वागणारी
कधीही न तुटणारी
प्रत्येकाचा विचार करणारी
मैत्री ही थोर
वेळ काळ न
सांगता धावून येई
पावसाचे कधी रौद्र रूप
धारण करी
जेव्हा असेल संकटात
आपली ही मैत्रीण
सतत हसतमुख राहणारी
तुझी माझी मैत्री
मैत्री ही जगावेगळी By कु. Kashmira Ulhas Gupte | Best Friend Poem Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
मैत्री ही जगावेगळी By कु. Kashmira Ulhas Gupte | Best Friend Poem Marathi 2023