Friendship Maitri Kavita

वस्त्र जरतारी By Jaya Balakrishna Rao | Best Friendship Maitri Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी Jaya Balakrishna Rao. यांची -वस्त्र जरतारी – हि कविता -Friendship Maitri Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

वस्त्र जरतारी By Jaya Balakrishna Rao | Best Friendship Maitri Kavita 2023

वस्त्र जरतारी | Friendship Maitri Kavita

वस्त्र जरतारी By Jaya Balakrishna Rao | Best Friendship Maitri Kavita 2023

मी तर होते सामान्य तरूणी ;
कलाकार वा नव्हते विदुषी .
न कळे का परी तरीही मजला
मैत्र नजराणा तू हर्षे दिधला ? १.

विश्वास जरी तू जशी मोहक रजनी
विश्वास दिला मज जसा देई भगिनी .
मस्त शशी तू , मी सान चांदणी ;
झुलू दे मजला तूझिया अंकी. २.

कधी भासली तू मज परदेशी
सुंदर मोहक तरूणी काश्मिरी .
आहेस परी ग अशी तू रमणी
अंतस्थ अगदीच , सखी मोहिनी. ३.

नकळत येता तुझिया जवळी
भासले जणू मी तुझीच सांवली .
माझीच गाणी , तुझी वाणी गायिली
सूर तेच तरल , उर्मि उसळली . ४.

जादू परी ती तुझी निराळी ;
कशी साधू सांग तुझी संगती ?
सुगंध तुझा ग फार निराळा ;
देशील कां मजशी सांग थोडा ? ५.

दिली मजला तू ती परीस माया ;
उजळवली माझी ही जीवन काया .
लूटली मजवरी प्रीत सुगंधी ;
बनली माझी प्रिय सखी चंदेरी. ६.

कांठोकाठ मैत्र पात्र भरले ;
आहे कां मी परी पात्र सखये ?
लाभता तुझी नितळ ,शीत छाया
मी बहरले मिळता तव माया . ७.

कृष्ण रमला जरी तो द्वारकेला
गोकुळी व्याकुळले गोप, बाला
निवास तुझा कधी कधी काश्मिरी
दिलास मला बघ गंध केशरी. ८.

जरतारी वस्त्र मग मीही विणले ;
विणतांना ना कधी जराही थकले.
नक्षीकाम त्यावरी सुबक रेखिता
मैत्रबंध मग ते घट्टसे जुळले. ९.

उभ्या आडव्या धाग्यात भरलेले
श्वास कधी विरोधी तंतू भासले.
परी गुंतल्या हृदयी प्रीत रूजता
तुझ्या माझ्यात मैत्र गीत उमटले. १० .

मनांत गाता सुरेल पक्षी
भाव भिजला तो सुर गंधी .
विश्वासाचा शुद्ध स्वर सापडता
वस्त्रासही लाभली विमल नक्षी . ११.

डोळ्यांच्या डोहात काळ्या रमलेल्या
स्नेह सांखळ्या मग अशा उसळल्या
कि कालप्रहारे भीषण अशा
नाही कधी त्या निखळल्या. १२.

मैत्रीच्या मंगलशा सुलेखातूनी
प्रीत ज्योत मंद अखंड तेवली.
गीत गोड , हळवे गातां जयाचे
मन हरखले , दिपवून गेले. १३.

जया बाळकृष्ण राव.

स्वलिखित रचना
————————————————————————————

Friendship Maitri Kavita 2023

वस्त्र जरतारी By Jaya Balakrishna Rao | Best Friendship Maitri Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *