FSSAI Jobs: स्वयंरोजगाराची नवी संधी
भारत एक असा देश आहे ज्याच्याकडे खूप लोकसंख्या आणि मोठी क्षमतापण आहे अन्नविषयक व्यवसायांमध्ये वाढ करण्याची आणि त्यातून भरभराटीची. व्यवसाय सुलभतेसंबंधीच्या जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार भारतचा यात ७७ वा क्रमांक लागतो. आपल्या माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार या स्थानाला टॉप ५० मध्ये न्यायचं आहे. त्यांच्या या संकल्पाला बळकटी देण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (FSSAI) त्यांच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल अंगिकारला आहेत. तो बदल म्हणजे फक्त एक अनुपालक नियामक असण्याकडून अन्न सुरक्षा इकोसिस्टीम सक्षम करणारा असा आहे. अन्न व्यवसाय क्षेत्रातील एक मोठा भाग हा असंघटित आहे आणि म्हणूनच मोठे व्यावसायिकच नाही तर छोटे व्यावसायिक व अन्न विक्रेते यांच्याकरितासुद्धा एक समग्र दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे. हा दृष्टिकोन जमिनी पातळीवर सक्षम करण्यासाठी fssai ने पुढाकार घेऊन अन्न सुरक्षा मित्र food safety mitra हि योजना सुरु केली आहे.हि योजना काही प्रेरित व्यक्तींना जे अन्न सुरक्षा मित्र म्हणून प्रमाणित (certified) असतील. असे फूड सेफ्टी मित्र अन्न व्यवसायचालकांना (FBO) FSS ऍक्ट अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींचे करण्यासाठी साहाय्य करतील. त्याचबरोबर fssai, इतर सरकारी आणि निम सरकारी संस्था, नागरी संस्था, खासगी संस्था, यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावरील काम पुढे नेईल. फूड सेफ्टी इकोसिस्टिम सक्षम करण्यासाठीची असलेल्या प्रेरित व्यक्तींची भूमिका गेमचेंजर ठरेल.

FSSAI Jobs: स्वयंरोजगाराची नवी संधी
‘अन्न सुरक्षा मित्र’ चे ३ रूप असतील जसे कि; डिजिटल मित्र, ट्रेनर (प्रशिक्षक) मित्र, Hygiene (स्वच्छता) मित्र.
FSSAI Job डिजिटल मित्र: –
अन्न व्यवसाय चालकांना (FBO) fssai च्या ऑनलाईन पोर्टलवर license व रेजिस्ट्रेशन संबंधी तसेच FSS ऍक्ट च्या इतर नियमांसंबंधी मार्गदर्शन करेल, त्यांना संपूर्ण साहाय्य देईल.
FSSAI Jobs ट्रेनर / प्रशिक्षक मित्र:-
प्रशिक्षक मित्र हा fssai कडून विधिवत प्रशिक्षण घेतलेला व प्रमाणित केलेला व्यक्ती असेल. तो FBO ना FSS ऍक्ट व नियम तसेच त्यांच्या अंमलबजावणी बाबत प्रशिक्षण देईल.
FSSAI Job स्वच्छता मित्र:-
संपूर्ण भारतात स्वच्छ व सुरक्षित खाद्य उपलब्धतेचे लक्ष्य गाठण्यासाठी स्वच्छता मित्र, FBO चे आउटलेट/ दुकांनाचे ऑडिट करतील. आणि त्यांना स्वच्छता नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी सेवा बजावतील. हि योजना या देशातील युवांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करेल. जवळपास ५०००० असे नवयुवक या योजनेला जोडले जाणे अपेक्षित आहे. नोंदणी व परवाना, स्वच्छता रेटिंग, व अन्न सुरक्षा प्रशिक्षण अशा सेवा पुराव्यामधून २५ लाखांपेक्षा जास्त FBO ना गुंतवण्याचा अंदाज आहे. तसेच त्यातून क्षमता बांधणीची इकोसिस्टिम तयार करणे व रोजगार निर्मिती करण्यात हातभार लावण्याचा मानस आहे.
FSSAI Jobs: स्वयंरोजगाराची नवी संधी
FBO च्या गरजांना पूर्ण करण्यासाठी प्रतिसाद देणारी विविध स्तरांची इकोसिसिटीम वापरून समाजातल्या अंतिम स्तरापर्यंत स्वयंप्रेरित व स्वयंरोजगारीत, अनुपालन (regulatory) व्यवस्था निर्माण करण्याचे अन्न सुरक्षा मित्र योजनेचे उद्दिष्ट आहे. जे FSSAI आणि राज्यातील अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयत्नांना पूरक असेल. या योजनेत सहभागी होण्या करता सर्वांचे स्वागत आहे. योजने बद्दलची सर्व माहिती फूड सेफ्टी मित्र च्या पोर्टल वर उपलब्ध आहे. अधिक माहिती करता खालील क्रमांकावर संपर्क करू शकता. अथवा ई-मेल करू शकता.
https://fssai.gov.in/mitra/loadIndexData
फूड सेफ्टी मित्र चे सर्विस चार्जेस खालील प्रमाणे असतील.
सेवा प्रकार | सेवेचा दर |
रेजिस्ट्रेशन (नोंदणी) अर्ज भरणे, आणि त्याचे नूतनीकरण करणे. | ₹१००/- |
परवाना अर्ज करणे, परवान्यात बदल करणे, व वार्षिक रिटर्न भरणे. | ₹५००/- |
प्रशिक्षण- बेसिक, अडवान्सड, स्पेशल स्तर | ₹२०००/- १५ पेक्षा कमी कामगारांकरिता, ₹५०००/- पर्यंत १५ किंवा त्यापेक्षा जास्त कामगारांकरिता. |
स्वच्छता ऑडिट | ₹२०००/- १५ पेक्षा कमी कामगारांकरिता, ₹५०००/- पर्यंत १५ किंवा त्यापेक्षा जास्त कामगारांकरिता. |
FSSAI Jobs: स्वयंरोजगाराची नवी संधी
***FSSAI यात वेळोवेळी बदल सुचवू शकते.***

FSSAI Jobs: स्वयंरोजगाराची नवी संधी
Author-संकेत अहंकारी
सर्टिफाइड फूड सेफ्टी मित्र
FSM ID FSMDM003155
Contact- ८६२३८५५८३३
Email- foodsafetymitra@yahoo.com