funny love poem in marathi in 2024

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

funny love poem in marathi in 2024

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्य स्पर्धा
दि. १०/३/२०२४
विषय – ऑनलाइन प्रेम

आभासी ओढ | funny love poem in marathi in 2024

मोबाईलच्या जमान्यात
साथ एकमेका बोलण्याची,
आवड प्रत्येकाच्या मनात
काही तरी नवीन करण्याची
!१!
स्टेटस बघता इतरांनाही
आनंदाचे जुळून येती सूर,
मोबाईलच्या डीपी वरील
फोटो बघताच मन होई भूर
!२!
सहजच बोलून कळवितो
मनातल्या गुपित भावना,
कायमचे फोटो काढून
एकमेकां पाठवे हीच कामना
!३!
अजाणतेपणी ओढ लागते
एकमेका संदेश पाठविणे,
विविध कोड हेतू वेगळा
ऑनलाईन प्रेमाचे हे वागणे
!४!
संदेश पाठविणे सवयीने
नित्य घडत जाते वारंवार,
परिणामी रूसणे, फुगणे, रडणं
रूपांतरीत होते सारे निरंतर
!५!
क्षणोक्षणी करतो विचार
काय करतेस?कोण जाणे?
मनातले विचार सैरावैरा
भटकंती करती सहजपणे !६!

मनोभावे आवड जडते
मनात सगळ्या प्रेम भावना,
जसा जसा विचार मनात
तेच संदेश पाठवण्या साधना
!७!
प्रेम जिव्हाळा आपुलकी
घडवून येते मोबाईल जगात,
मैत्रीच्या वाटेवर पाऊलखुणा
मन मनास दाखवी प्रेम क्षणात
!८!
नव्या युगाचे प्रेम आभासी
खरोखरच वाटते प्रत्येकाला,
फोटो बघताच भान हरपते
परिणामी भेट होते प्रत्यक्षाला
!९!
ऑनलाईन प्रेमाचे येती वारे
साथ काही खरीच नसते,
परिणामी प्रेम म्हणजे सोपं नव्हे
सात जन्माची सवे शपथ असते
!१०!
म्हणून सांगे शब्द कवी मनाचे
नव तरूण, तरूणीला कामाचे,
विश्वासाने संस्कृतीचे जतन करा
संस्काराचे मोती हेच मानाचे
!११!

@अनंत वा तेलंग
देऊळगांवराजा
जिल्हा बुलढाणा

funny love poem in marathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *