काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.स्वरूपा कुलकर्णी यांची -बाप्पा निघाले गावाला- हि कविता -ganpati gele gavala chain padena amhala- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
बाप्पा निघाले गावाला By सौ.स्वरूपा कुलकर्णी| Best ganpati gele gavala chain padena amhala 2023
बाप्पा निघाले गावाला | ganpati gele gavala chain padena amhala 2023

गणनायका तू महागणपती
विघ्नेश्वरा तू मंगलमूर्ती,
भक्तांची तू इष्टदेवता
मोरेश्वरा मी नमीते तुजसी।।
जास्वंदीची फुले वाहिली
वरी दुर्वांकुरे शोभली,
मोदक प्रिय बहू तूजला देवा
मखरी शोभली मुर्ती साजिरी।।
विनायका तू घरा येसी
दहा दिवस ती आनंदाची,
भक्ती-सुमने तुला वाहिली
लंबोदरा तू विघ्ने हरशी ।।
आरती पुष्पांजली गाती सारी
नवचैतन्याची सळसळ झाली,
मने ही सारी भक्तीत नाहली
बाप्पा आगमने चिंब भिजली।।
भक्ती शक्ती दाता गणपती
रिद्धी सिद्धी वरदायक तुची,
लक्ष्मीदेवी तुझ्या संगती
विद्यादेवी विद्या देई।।
वंदितो महागणेशा तुजसी
तुझी छत्रछाया मजवरी,
वरदहस्त राहो माथी
गणराया हे आशिष देशी।।
जागर तुझ्या नामाचा अन्
घरोघरी गीतगायने,
आबालवृद्ध रंगून गेले
कसे कळेना दिस हे सरले।।
तू निघाला परतण्यास गावा
किती कासाविशी मजला होई,
मन झाले अनावर आता
आठवण ठेव बाप्पा आमुची ।।
तू आला धूमधडाक्यात
तू चाललास धूमधडाक्यात,
निरोप देतांना मात्र तुला
बाप्पा गलबलले मी मनात।।
पाऊस हजर तुझ्या समोरी
जणू भेटण्या आतूर तोही,
कसे नी किती गुंतलो देवा
ताशा नी वाद्ये नाचती समोरी।।
तू भक्तवत्सल देवा गणेशा
सोडून आम्हा निघालास गावा,
मन लागले चरणांशी तुझिया
अश्रू अनावर होती आता।।
तुझी लेकुरे आर्त सारी
नको विरह आम्हा जराही,
तू निघाला दुःख होते जीवाला
रिकामा मखर उदास पाही।।
चैन मजला नसे जराही
तू चालला आपुल्या रे गावी,
पुन्हा लवकर ये भेटण्यासी
विरही मन व्याकूळ होई।।
नयनी दाटले अश्रू किती
बाप्पा विसरू नको मजसी,
वाट पाहू तुझी पुन्हा पुन्हा
येरे देवा आम्हा भेटण्या।।
आभाळ भरलं तू येतांना
डोळे भरती तू जातांना,
निरोपाला समुद्र उचंबळे
कशी ही लीला बाप्पाची।।
तुझ्या आगमने कार्यसिद्धी
तुझ्या निरोपात कार्यपूर्ती,
नको रे विरह वर्षाचा देवा
लवकर लवकर भेटीस येसी।।
जाण्यास निघाला गणेश माझा
खिन्न मनाने नमितो तुजला
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या।।
बाप्पा निघाले गावाला By सौ.स्वरूपा कुलकर्णी| Best ganpati gele gavala chain padena amhala 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
बाप्पा निघाले गावाला By सौ.स्वरूपा कुलकर्णी| Best ganpati gele gavala chain padena amhala 2023