माझा बाप्पा By श्री.रमेश अनंत चव्हाण| Best ganpati gele gavala quotes in marathi 2023

माझा बाप्पा By श्री.रमेश अनंत चव्हाण| Best ganpati gele gavala quotes in marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.रमेश अनंत चव्हाण यांची -माझा बाप्पा- हि कविता -ganpati gele gavala quotes in marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

माझा बाप्पा By श्री.रमेश अनंत चव्हाण| Best ganpati gele gavala quotes in marathi 2023

माझा बाप्पा | ganpati gele gavala quotes in marathi 2023

ganesh visarjan poem visarjan quotes in marathi Ganpati Bappa Visarjan Caption in Marathi ganpati gele gavala quotes in marathi

निरोप घेतो आज देवा तुमचा भरल्या मनाने आम्ही
गोड आशीर्वाद देऊन आम्हा आज्ञा असावी
तुमच्या सेवेत काही नकळत चूक झाली
तर बाप्पा आम्हाला मनापासुनी क्षमा असावी!!१!!

जाताना ही बाप्पा तुमचे लोभणीय रूप
किती अस्मरणीय तेजपुंज आम्हा जणू भासते
पुन्हा पाहता डोळे भरून रुपाकडे आम्ही
तुमच्या परतण्याची ओढ सदैव मना वाटते!!२!!

डोळ्यात दाटले अनावर अश्रू बाप्पा तुम्ही जाताना
राहूदे तुमचा आशीर्वाद कायम विसरू नका तुम्ही
सुख समृद्धी आनंदमय करून चाललात घर आमुचे
पुढच्या वर्षी आगमनाची वाट आतुरतेने पाहू आम्ही!!३!!

बरसून मेघरुपी पुष्प सुमने तुमच्यावरती
आभाळ भरलं धरती नटली होती तुम्ही येताना
आता मनात दुःख आणि नयनी येतो पाणी
बाप्पा तुम्हाला आनंदाने निरोप देताना!!४!!

अकरा दिवसांचा तो सोहळा आनंदाचा अन भक्तीचा
दंगुणी गेलो आम्ही रात्रंदिवस तुझ्या भाव भक्तीत
चाललात सोडून आम्हा तुम्ही आज करवून सेवा
डोळ्यात आले पाणी काहूर माजले आमच्या मनात!!५!!

लहान थोर उधळीत गुलाल झाला एकच गजर
गावी जाताना बाप्पा दिसला तुमचा वेगळा थाट
हृदयात काहूर मनात परत येण्याची ठेऊन आस
जडावलेल्या पावलांनी चाललो डोक्यावर घेऊन पाट!!६!!

तुम्ही आलात घरी तेव्हा घर भरलं होत आनंदानं
येऊन घरा सुख समृद्धीची लहर आनंदाचे उधाण
तुमच्या जाण्याने सुन्न झाले घर झाला उजाड मखर
लागेना कशात ही मन जीव झाला आमचा बेजाण!!७!!

अकरा दिवस सेवा करण्यात दंगुणी गेलो आम्ही
करुनि उकडी मोदकाचा नेवैद्य पंचपक्वान्न खास
पाहता तुझ्या रिकाम्या आसनाकडे मन होते बैचेन
हुरहूर लागली ह्या जिवा गोड लगे नारे सुखाचा घास!!८!!

ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषाचा भक्तिमय संगम
निरोप देऊ तुला आज भरल्या डोळ्यांनी आनंदाने
विसरून देहभान नाचत दंगुणी गेलो तुझ्या मिरवणुकीत
चुकलं असेल तर देवा माफ कर मोठ्या अंतकरणाने!!९!!

माझा बाप्पा By श्री.रमेश अनंत चव्हाण| Best ganpati gele gavala quotes in marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

माझा बाप्पा By श्री.रमेश अनंत चव्हाण| Best ganpati gele gavala quotes in marathi 2023

4 thoughts on “माझा बाप्पा By श्री.रमेश अनंत चव्हाण| Best ganpati gele gavala quotes in marathi 2023”

  1. प्रफुल्ल मोडकले

    खूप छान निरोप या काव्य लेखणीतून बाप्पाला केलं आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *