काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.राजेश साबळे ओतूरकर यांची -तुम्हा पुन्हा विनवितो – हि कविता -ganpati nirop- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
तुम्हा पुन्हा विनवितो By श्री.राजेश साबळे ओतूरकर| Best ganpati nirop 2023
तुम्हा पुन्हा विनवितो | ganpati nirop 2023

गणेश चतुर्थी दिनी,
भाद्रपद महिन्यात!
आगमन होते तुझे,
मोठ्या थाटा माटात!!
घरी दारी अंगणात,
करू सुंदर आरास!
त्याला मखरात बसू,
देवू मोदकाचा घास!!
सुगंधी आगरबत्ती,
हाती आरतीचे ताट!
करू औक्षण चला,
टाळ मृदुंगाची साथ!!
तुम्ही गेला कुण्या गावा,
चैन पडेना जीवाला!
दहा दिवसांची सेवा,
काय विसरून गेला!!
श्रीगणेशा गणराया,
किती घेवू तुझी नाव!
अष्ट विनायका आहे,
तुझी ठाई ठाई गाव!!
तू गणांचा अधिपती,
गजमुख, वक्रतुंड!
तुझ्या धडावर शिर,
त्याला हातीची रे सोंड!!
चिमुकले तुझे डोळे,
बघा दिसे किती छान!
लोलक हिरेच जणू,
लुकलुक करी छान!!
शिरी मुकुट सोनेरी!
भाळी चंद्रकोर टिळा!
हाती त्रिशूळ डमरू,
हार मोतीयांचे गळा!!
भले मोठे पोट तुझे,
सूपा एवढे रे कान!
कसा ऐटीत बसतो,
हरपते देहभान!!
तुझ्या येण्या आधी आम्ही,
लई गाजा वाजा केला!
मंचकी बसवून तुला,
मनोभावे रे पूजिला!!
इच्छा मनातील साऱ्या,
आता पुरी करा देवा!
तुझ्या दर्शनाचा लाभ,
भक्त जनाशी रे व्हावा!!
भले बुरे भक्त सारे,
देवा तुझ्या पाशी येती!
सुख दुःखाचे गाऱ्हाणे,
हात जोडून सांगती!!
लंबोदर म्हणती तुला,
त्यात दुनियेचे पाप!
साऱ्या भक्तासाठी तुझे,
असे सारखेच माप!!
दीड दिस कोणी देवा,
सेवा तुझी रे करतो!
कोणी पाच सात दहा,
पूजा अर्चना करतो!!
सान थोर सारे भक्त,
तुझ्या सेवेत रमती!
रात्रदिन तुझ्यासाठी,
रोज भक्ती गीत गाती!!
समाजाच्या सेवेसाठी,
कोणी हौसेने पुजितो!
तू नवसाचा गणेश,
म्हणे भक्ताला पावतो!!
दुर्वा, श्रीफळ, केवडा,
तुझ्या चरणी वाहतो!
तुझ्या रे दर्शनासाठी,
उभा रांगेत राहतो!!
दहा दिसाचा आनंद,
एका क्षणी घालवतो!
घेता भक्तांचा निरोप,
जीव कासावीस होतो!!
अनंत चतुर्दशीला!
निरोप देती तुजला!
येता नयन भरुनी,
भक्त गण भेटायला!!
जन भक्तीचा सागर,
करी निरोप तयारी!
नदी काठी, जळी स्थळी,
कोणी सागराच्या तीरी!!
विसर्जन करताना,
डोळा भरून पाहतो!
यावे पुढील वर्षाला,
तुम्हा पुन्हा विनवितो!!
तुम्हा पुन्हा विनवितो By श्री.राजेश साबळे ओतूरकर| Best ganpati nirop 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
तुम्हा पुन्हा विनवितो By श्री.राजेश साबळे ओतूरकर| Best ganpati nirop 2023