काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.वैशाली सुनील मुन यांची -गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना जीवाला- हि कविता -ganpati nirop quotes in marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना जीवाला By सौ.वैशाली सुनील मुन | Best ganpati nirop quotes in marathi 2023
गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना जीवाला | ganpati nirop quotes in marathi 2023

झाले गणपती बाप्पाचे आगमन
हर्ष झाला माझ्या मनाला,
सैदव सुखी ठेव माझ्या घरच्यांना
हदयी वास नेहमीच राहु दे गजानन.. १
लंबोदर नाव तुझे देवा
राहु दे सैदव हेच मुखी,
विघ्नहर्ता बुद्धीदाता
सर्वा ठेव सदा सुखी…. २
झटकन धाव घेती भक्तजण
करणार तुझी विनवणी,
तुच एक संकटी पावशी
पायी तुझ्या आळवणी…. ३
दूर्वा, पुष्पे, गळी माळा
आवडे तुज जास्वंद फुल,
तुझे रूप सोजळ बघुन
जणु हासरे छोटे मुल… ४
दारी टाकली रांगोळी
येता पाऊले जीवनी,
आगमन होता घरी माझ्या
भरे सुवास हा सदनी…. ५
प्रथम तुला वंदीते
माझ्यावर कृपा तू करशील,
तुझ्या चरणी माथा ठेवतो
देवा माझ्या संकटकाळी धावशील…. ६
तुच कर्ता, तुच करविता
मंगल मुर्ती, तु गणनायका,
प्रथम पुजन तुझे हाच तुझा मान
अनेक नावात शोभे सिद्धी विनायक….
गणपती बाप्पा तुला
सांगुन सांगून थकले,
माझ्या तुटक्या संसाराचे
गराणे तुझ्यापुढे मांडले…. ८
गणपती बाप्पा तुझ्या येण्याने
घरांत रेलचेल सूरू झाली,
हे सगळे बघुन माझ्या मनात
आनंदाने भरती आली…. ९
गणपती बाप्पा शेवटी सांगणे
पुढच्या वर्षी लवकर या हेच मागणे,
नको देवु हिरे, माणिक मोती मजला
लवकर येशील सुख शांती घेऊन येणे…. १०
गणपती बाप्पा तुझ्या नावात
लपलेले आहेच जीवनाचे सार,
नेहमीच माझ्या पाठीशी राहा
किती झाले तरी दुःखाचे वार… ११
तुझ्या निरोप घेता बाप्पा
आता पानावले माझे डोळे,
माझे दुःख कुणा सांगू ते
आता प्रश्र मनी पळे…. १२
गणपती बाप्पा असा कसा रे
तु दहा दिवसाचा पाहुणा,
कसा निरोप देवु तुला आता
होईल दूर जाण्याचा दिसतात खुणा…. १३
गणपती बाप्पा परतुन येशील
तेव्हा मला नको सोडुन जाऊ,
कशाला वाट पाहु पुढच्या वर्षीची
आपण दोघे एकत्र जीवनभर राहु…. १४
गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना जीवाला By सौ.वैशाली सुनील मुन | Best ganpati nirop quotes in marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना जीवाला By सौ.वैशाली सुनील मुन | Best ganpati nirop quotes in marathi 2023