gauri ganpati caption in marathi

माहेरवाशीण आणि ये ग ये ग गौराई | 2 Best gauri ganpati caption in marathi

डॉ. मानसी पाटील आणि वीणा पाटील यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत gauri ganpati caption in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

माहेरवाशीण | gauri ganpati caption in marathi

स्पर्धेसाठी
काव्य बंध समूह आयोजित
काव्यलतिका
प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा
दि ७/९/२३
विषय:गौराई आली घरा

माहेरवाशीण
( षडाक्षरी रचना)

माहेरवाशीण आणि ये ग ये ग गौराई | 2 Best gauri ganpati caption in marathi

भाद्रपद मास
अतिथी गं‌ घरा
ज्येष्ठा नी कनिष्ठा
हर्ष घरादारा…..१

सडा संमार्जन‌ ‌‌
रांगोळी दारात
गौरीआगमन
सारे आनंदात …..२ ‌
‌‌.
माहेरवाशीण
उभी आता दारी
दूध पाणी घाला
तिच्या पायावरी…..३

सोन्याच्या पाऊली
गौरी आली घरी
रूप्याच्या पाऊली
चैतन्याने भरी…..४

फुलांची आरास
मखर सजले
तिच्या स्वागतास
हार नाना फुले…..५

रुप्याच्या पाऊली
घरात फिरली
पाहुनी सुबत्ता
मखरी बैसली…..६

साडी जरतारी
गळा मोती हार
प्रसन्न दिसते
सुवर्णालंकार …..७

भाजी भाकरीचा
नैवेद्य दाविला
आगमन शीण
असा घालविला…..८

या गं या सख्यांनो
ओटी तिची भरा
ज्येष्ठा नी कनिष्ठा
आल्यात माहेरा…..९

षोडशोपचारे
करूया पूजन
आज खास असे
नैवेद्या बोडण ….१०

महानैवेद्याने
सजले ते ताट
काय वर्णू तिचा
किती थाटमाट….११

पुरणाचे दिवे
आरती तालात
गाती आनंदात
स्तुती ती सुरात…..१२

तीन दिवसांची
निघते पाहुणी
होते जड मन
डोळा येई पाणी ..१३

एकच मागणे
कृपा छत्र धरी
आशिषाचा हात
ठेव‌ सदा शिरी ….१४

©️®️ डॉ मानसी पाटील
मुंबई

गौराई | 2 Best gauri ganpati caption in marathi

ये ग ये ग गौराई | gauri ganpati caption in marathi

काव्यबंध समुह आयोजित साप्ताहिक काव्य लतिका स्पर्धा…
7/9/2023
विषय… गौराई आली घरा
शीर्षक… ये ग ये ग गौराई

ये ग ये ग गौराई | 2 Best gauri ganpati caption in marathi

श्रावण सरला बाई सरला
भाद्रपद मास हा ग आला
गौरी गणपतीचा येई सण
माहेरी जाण्या जीव आसुसला….1

माझ्या माहेरच्या अंगणात
झिम्मा,फुगडी चला खेळूया
मैत्रीणी माझ्या सगळ्या येता
गप्पागोष्टीत रंगून ग जाऊया…2

चला जाऊ नदीवर सार-या
पानाफुलानी गौराई सजवून
वाजत गाजत आणुया घरी
गौराईसंग येऊ नटून थटून…..3

आई माझी उभी ग दारात
लिंबलोनं टाकेल उतरून
पाणी घालून पायावरी
हळदी कुंकू लावी धूप ओवाळून….4

गौराई आली ही घरी
धनलक्ष्मी, समृद्धी घेऊन
मिळे तिचा आशीर्वाद
घर जाई माझं आनंदून….5

भाजी भाकरीचा नेवैद्य
केली थापीव वडी खमंग
माहेरपणास आतुरलेली
येता माहेरी झाली गूंग….6

साडी नेसवली जरीकाठी
सुखदुःखाच्या गोष्टी ती बोलत
गंगा गौरी बसल्या येऊन
घेतला गणोबाला कुशीत….7

आला शंकरोबा ग नंतर
काय रुबाब बाई त्याचा
नेवैद्याचा आखला बेत
खास दूधतुप पुरणपोळीचा….8

खेळ, खेळ, खेळे गौराई
रात सारी रंगली फुगड्यात
पतीदेवाचा कौतुकाचा उखाणा
ऐकता मैत्रीणींच्या चेष्टा चालत……9

गौराईचं होता आगमन
समाधान वाटे किती मनास
ये ग ,ये ग,माझे गौराई
तुझ्यामुळे घरपण घरास…10

वीणा पाटील
कोल्हापूर

गौराई | 2 Best gauri ganpati caption in marathi

gauri ganpati caption in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
8 − 7 =