रुपाली मठमती आणि सौ. सुवर्णा पवार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत gauri ganpati caption विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
गौरी नंदना | gauri ganpati caption
काव्यबंध समूह आयोजित
काव्यालतिका
विषय:- गौराई आली घरा
शीर्षक:- गौरी नंदना

उठा उठा हो गौरी नंदना
आला दारी रवी वंदना
पसरला चौफेर पारिजातकेचा सुगंध
ठेवले उघळून चंदन गंध
उठा उठा हो गौरी नंदना
आला दारी रवी वंदना
वेचून ,वेचून बेल आणले
कोठून ,कोठून फुले लाल मिळवले
घेऊन दूर्वा ,उभी धेनू दर्शनाला
उठा, उठा हो गौरी नंदलाला
हरी सोडुनी गौरी निघाली
संगे गंगेला घेऊन म्हणाली
आनु परत विनायकाला
शोभा नाही ,गणू विन ,कैलासाला
उठा ,उठा हो गौरी नंदना
आला रवि ,दारी वंदना
रांगोळ्यांनी सडे सजविले
फुला फुलांचे हार गुंफले
गौराई उतरली आहे धरा
येईल क्षणात कधीही घरा
गणू पाहूनी दोघी हरकल्या
भाजी भाकर आवडे गौरीला
मोदका सोबत खीर ही बनविला
धूप ,दीपांचा नैवेद्य दाविला
उठा उठा हो गौरी नंदना
आला रवि दारी वंदना
अरबाट सुखहरत्याचा, भरभराट दुखहरत्याचा
पाहून जल्लोष पाच दिवसाचा
दंग होऊनी गंगा पानावली
विसरूनी भान गौरा माई हरपली
चंदन ज्योती सोबत आरती
हाती पोथी ,माथी माणिक मोती
लाल केशरी कमरेला धोती
दृष्ट न लागे बाळा ,गौराई बोलली
मायलेखांची शोभे जोडी
पुरे पाच दिवसाची गोडी
वचन देऊन गौरमाई निघाली
पाठवीन परत पुढल्या वर्षी म्हणाली
उठा ,उठा हो गौरी नंदना
आला दारी रवी वंदना…
रूपाली मठपती
संकेश्वर….
गौरी नंदना आणि अंबाबाईची आरती | 2 Best gauri ganpati caption
अंबाबाईची आरती | gauri ganpati caption
स्पर्धा करीता
काव्यबंध समूह
काव्यलतिका
प्रत्येक गुरुवारी होणारी स्पर्धा
दि . ०७ सप्टें . २०२३
विषय = गौराई आली घरा
स्वरचित
काव्यप्रकार – आरती
शीर्षक = अंबाबाईची आरती

जयदेवी जयदेवी, जय अंबाबाई
ओवाळीते आरती, तुझी ग आई ॥ धृ०॥
अंबाबाई ल्याली, सौभाग्याच लेण
देई मला हळदी, कुंकवाच देण
आशिर्वाद देण्या , आली ग गौराई
ओवाळीते आरती, तुझी ग आई ॥१॥
जयदेवी जयदेवी, जय अंबाबाई
ओवाळीते आरती , तुझी ग आई ॥ धृ ॥
अंबाबाई तुझी, वात्सल्याची नजर
भक्तांवर घाली, मायेचा ग पदर
खण नारळाची ,ओटी भरून जाई
ओवाळीते आरती, तुझी ग आई ॥२॥
जयदेवी जयदेवी , जय अंबाबाई
ओवाळीते आरती, तुझी ग आई ॥ धृ ॥
नेसली शालू , पैठणी भरजरी
नथीचा हिरा, चमचम करी
सौभाग्य अलंकार , मज तू देई
ओवाळीते आरती, तुझी ग आई ॥३॥
जयदेवी जयदेवी , जय अंबाबाई
ओवाळीते आरती , तुझी ग आई ॥ धृ॥
भक्तांचे साऱ्या , करीते रक्षण
अंबाबाई तुझे मी , करीते औक्षण
तुझ्या दर्शनाची, झाली ग घाई
ओवाळीते आरती, तुझी ग आई ॥४॥
जयदेवी जयदेवी, जय अंबाबाई
ओवाळीते आरती, तुझी ग आई ॥ धृ॥
तुझ्या दर्शनाची , लागली आस
तुझ्या आशिर्वादाचा , घेतला ध्यास
माया ममता , तुझ्या ग ठायी
ओवाळीते आरती, तुझी ग आई ॥५॥
जयदेवी जयदेवी, जय अंबाबाई
ओवाळीते आरती, तुझी ग आई ॥धृ॥
सौ. सुवर्णा पवार,
इचलकरंजी

गौरी नंदना आणि अंबाबाईची आरती | 2 Best gauri ganpati caption
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
गौरी नंदना आणि अंबाबाईची आरती | 2 Best gauri ganpati caption