प्रा. शरदचंद्र काकडेदेशमुख आणि मंगल राजाराम यादव यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Gauri Ganpati Festival Poem in Marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
महालक्ष्मी | Gauri Ganpati Festival Poem in Marathi
स्पर्धेसाठी
काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका स्पर्धा
दिनांक.. ८ /९ /२०२३
विषय… गौराई आली घरा
शीर्षक.. …. महालक्ष्मी

आवाहन करता आदरभावे
पहा गौराई आली घरा
पूजन करता घ्या मिटून नयन
हृदयी लक्ष्मी मातेला स्मरा ।।१।।
म्हणती तुजला भक्तजन
महालक्ष्मी माता
एक पार्वती तर दुसरी गंगा
आनंद होतो गुणगाता ।।२।।
गौरी आहेस तू विश्वमाता
शिवाच्या शक्तीचे दिव्य रुप
स्वागतासाठी आम्ही सज्ज
पुढयात ठेवीले दही दूध तूप।।३।।
जेष्ठा गौरी अथवा कनिष्ठा
रुप तुझे गं असे दिव्य
सजवून ठेविले घरदार
चहुदिशांनी भव्य ..।।,४।।
आणिले पंचपक्वानाचे
चमकते चांदीचे नक्षीदार ताट
दोन्ही बाजूला गोड धोड
मधोमध ठेवीला पाट ।।५।।
विविध अलंकाराने सजविले
नेसवून तुजला भरजरी साडी
दृष्ट न लागावी तुजला
आयाबायांनो नका करु चहाडी ।।६।।
तुझ्या आगमने माते लक्ष्मी
अतु प्रसन्न झाले माझे मन
नांदु दे घरात .सदैव सुख शांती
ऐश्वर्य समृद्धी उदंड धन ।।७।।
प्रा. शरदचंद्र काकडेदेशमुख
पुरंदर पुणें
गौराई गीत | Gauri Ganpati Festival Poem in Marathi
स्वरचित,
काव्यबंध समूह आयोजित काव्य लतिका स्पर्धा.
दि. ७/९/२०२३
विषय-गौराई आली घरा.
शीर्षक-गौराई गीत.

शिक्षक गौराई आल्या गं माहेराच्या घरात,
त्यांच्या गं ज्ञानाच्या आवाजाचा नाद घुमतोय घराघरात.
डाॅक्टर गौराई आल्या गं माहेराच्या घराला,
त्यांच्या गं कार्याची साद मिळतेया जगाया.
संशोधक गौराई आल्या गं माहेराच्या घराला,
त्याच्या गं शोधाला मिळतोया सन्मान सार्यांचा.
समाजसेवक गौराई आल्या गं माहेराच्या घराला,
त्यांच्या गं सेवेची नोंद गौराईच्या अंगणाला.
पायलट गौराई आल्या गं माहेराच्या घरात,
या गं सार्या मिळूनी सैर करुया गगनात.
सैनिक गौराई आल्या गं माहेराच्या घरात,
देशसेवेच्या गं व्रताने भारलेल्या मनात.
वकील गौराई आल्या गं माहेराच्या घराला,
सत्याच्या गं बाजूने दुर्जनांचा नायनाट करायला.
घालूनी गं फुगडी, गाऊनी गं गाणी,
गौराईच्या सणाला गं ,थोरवी गातात गं राणी.
मंगल राजाराम यादव.
शिराळा.जि.सांगली.

Gauri Ganpati Festival Poem in Marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह