gauri ganpati kavita in marathi

माझी गौराई आणि येता गौरी दरात | 2 Best gauri ganpati kavita in marathi

सौ. शारदा राम मालपाणी आणि राजेश साबळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत gauri ganpati kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

माझी गौराई | gauri ganpati kavita in marathi

काव्य बंध साहित्य समूह आयोजित
काव्य लतिका स्पर्धेसाठी कविता…
विषय.. गौराई आली घरा
🖊️🌹शीर्षक….माझी गौराई

माझी गौराई आणि येता गौरी दरात | 2 Best gauri ganpati kavita in marathi

माझी गौराई ज्येष्ठा अन कनिष्ठा
सोनियाच्या पावलांनी घरा आली
साष्टांग दंडवत देवी तव चरणी
हृदयी आनंदाची उधळण झाली. !१!

ज्येष्ठ अन् कनिष्ठाच्या आगमनाने
मनात भक्तीची ज्योत प्रकटली
दारात रांगोळ्यांची आरास केली
सोळा शृंगाराने मखरात विराजली.!२!

अडीच दिवसाच्या माहेराला येई
ही जगतजननी महालक्ष्मी गौराई
सोनियाच्या ताटात षडरस नैवेद्य
आनंदाने करी सुवासिन सरबराई .!३!

महालक्ष्मी घरी घेऊनिया आली
सुख-समृद्धी आनंदाचे आगर
भाविकाच्या मनात उसळला
भक्ती भावाचा अलोट सागर.!४!

संपूर्ण विश्वाची पालनकर्ती देवी
तुलाही आहे माते माहेराची आस
माहेरही सज्ज असे स्वागतस्तव
अडीच दिवसाची तू पाहूणी खास.!५!

महालक्ष्मी माते आशीर्वाद देई
आम्हाला ठेव माते तू सुखात
अराजकता अत्याचाराचा नाश कर
नांदू दे माते शांतता संपूर्ण जगात.!६!

🖊️🌹 सौ.शारदा राम मालपाणी
(काव्य सम्राज्ञी)
सर्वाधिकार सुरक्षित ©️®️
अमरावती

माझी गौराई आणि येता गौरी दरात | 2 Best gauri ganpati kavita in marathi

येता गौरी दरात | 2 Best gauri ganpati kavita in marathi

काव्य बंध समूह आम्ही मराठी साहित्य शिल्पकार
गुरुवार उपक्रम
काव्यलतिका
विषय:- गौराई आली घरा..


येता गौराई दारात

येता गौरी दरात | 2 Best gauri ganpati kavita in marathi

माय लेकी साऱ्या जणी,
अणू गौराई अंगणी!
तिला औक्षण करू या!!
माहेरच्या सुहासिनी!!

दारी अंगणात माझी,
छान मंडप घालून!
तिला सुंदर सजवू!
अलंकार ग लेवून!!

कशी नटते सजते,
दृष्ट काढावी वाटते!
नाकी नथानी लेवून,
कानी डुल ग घालते!!

डोई मुकुट सोन्याचा
पायी पैंजण वाजते!
गळा मोतियांचे हार,
गौरी सुंदर दिसते!!

उठा उठा ग साया नो,
झिम्मा फुगडी खेळू या!
माय लेकीच्या प्रेमात,
चला रंगून जावू या!!

असं नात हे नाजूक,
बाई अतूट प्रेमाचे!
माय लेकीच्या सुखाच,
जणू बंध रेशमाचे!!

साडी नेसून पैठणी,
बाई येई घाई घाई!
चारचौघीत येताना,
तिची लगबग लई!!

बाई उखाणा घालून,
घेई नवऱ्याच नाव!
लई तोऱ्यात बोलते,
जणू बघत राहावं!!

रीम झिम पावसात,
माहेरच्या माणसात!
माझी गौराई सजते,
माय बापाच्या घरात!!

येता गौराई दारात!
होतो गोंधळ गल्लीत!
जणू नवरी सजली,
आनंदाची बरसात!!

राजेश साबळे,ओतूरकर
उल्हासनगर (ठाणे)

गौरी दरात | 2 Best gauri ganpati kavita in marathi

gauri ganpati kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *