सौ. स्वरूपा कुलकर्णी आणि सौ. वैष्णवी परेश कुळकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत gauri ganpati quotes in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
आली आली गौराई माझी | gauri ganpati quotes in marathi
काव्यबंध समुह आयोजित,
काव्यलतिका स्पर्धा,
विषय- गौराई आली घरा
शिर्षक- आली आली गौराई माझी

आली आली गौराई माझी,
सोनपावलांनी आली,
घेऊन मांगल्याची किरणे,
उजळली घरदारं अवघी…
ज्येष्ठा आणि कनिष्ठा रूपे तुझी,
बहु गोड ती मना भावली,
भक्त प्रेमासाठी घेतसे रूप,
आवड देवी तुला लेकरांची..
आगमने तुझ्या चैतन्य पसरले,
मन हे माझे आनंदून गेले,
धूप, दीप, नैवेद्य, आरती,
सुगंध दरवळला दिशा दाही..
तीन दिसांची माहेरवाशीण तू,
पुत्र गणेशासवे घरा येशी,
घरातल्या लेकीबाळींसवे,
मनोमन आनंदून जाशी….
तुझ्या आवडीचे फराळ केले,
शुध्द तुपात लाडू मी वळले,
अनारसे करंजा पोटी मी घातले,
तूझ्यासाठी पंचपक्वान्न बनवले…
सोळा भाज्या सोळा चटण्या,
तुझ्यासाठी गोड जिन्नसही केले,
फळ,फुले दक्षिणा समोर ठेवली,
मनोभावे मी ओटी भरली…
तुझी पुजा मी भक्तीभावे करते,
माझी मनोकामना पूर्ण कर हे माते,
तुझ्या लेकीस सुखी ठेव आई,
विनंती चरणी वारंवार करते…
सौ.स्वरूपा कुलकर्णी
राहाता, अहमदनगर
आली आली गौराई माझी | gauri ganpati quotes in marathi
आली गौराई अंगणी |gauri ganpati quotes in marathi
काव्यबंध समुह आयोजित,
काव्यलतिका स्पर्धा,
विषय :- गौराई आली घरा
आली गौराई अंगणी

अंगणी माझ्या आली पहा आज समृद्धी ,
गौराईंच्या येण्याने माझ्या सुखात झाली वृद्धी !
वर्षातून एकदा येते माहेरवाशीण भरून काढण्या शीण ,
तिच्या अन माझ्या नात्याची विणली गेलीय नाजूक अशी वीण !
त्यांच्या स्वागतासाठी घालू रांगोळ्या आणि पायघड्या ,
नेसल्या बघा माझ्या ज्येष्ठा कनिष्ठा मखमली भरजरी साड्या !
रांगोळ्या पायघड्या फुले माळा यांनी केली शोभिवंत आरास ,
गौरींच्या येण्याचा दिन म्हणजे माझ्यासाठी स्वर्गसुख खास !
श्रमपरिहार करण्या लेकीबाळी आल्या हसले सारे अंगण ,
गौरी आल्यानंतर वातावरणात पसरे जणू मनमोहक चंदन !
सोनकळी सम अलवार माझ्या गौरी आल्या माझ्या घरी ,
ओटी भरण्या सजलेले तबक घेऊन उभी मी द्वारी !
भरता ओटी ज्येष्ठा कनिष्ठेची सुखांनी भरला माझा पदर ,
आदिमाया ती महालक्ष्मी धरी माझ्यावर तिच्या प्रेमाची चादर !
जमल्या साऱ्या सुवासिनी पाहण्या माझ्या गौराईंचे कौतुक ,
लिंबलोण काढण्या माझ्या माहेरवाशिणींचे बाई साऱ्याच उत्सुक !
हळदीकुंकू देऊन सुवासिनींना वाढवू त्यांचा मान ,
आल्या माझ्या गौराई अंगणी म्हणुनी आनंदा आले उधाण !
पंचपक्वान्न रांधते मी मोठ्या हौसेने माझ्या आईसाठी ,
आपसूकच मग समाधान पदरी येऊन सामावते माझ्या ओटी !
©®सौ. वैष्णवी परेश कुळकर्णी
नाशिक

gauri ganpati quotes in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह