अनिता बर्गे भोसले आणि सौ. संगीता अभंग यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत gauri ganpati status विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
गौराई माझी ऐक प्रार्थना | gauri ganpati status
काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका स्पर्धा
शीर्षक:- गौराई माझी ऐक प्रार्थना
दिनांक 7/09/2023

गौराई आली समृद्धी द्याला
सासुबाई या वर्षी सणाला
आमचं येणं नाही होणार
महालक्ष्मीचे आशीर्वाद
आम्ही घरी राहुनच घेणार
खूप वाटतं गावी यावं पण
कोरोनाने पसरवलाय कहर
चारीठाव गावी लक्ष लागलयं
खंड पडला ना कधी आजवर
अंगणापासून माजघरापर्यन्त
कामाची चालू असेल रेलचेल
वस्त्रमाळ,पोवते, फुलोऱ्याची
आठवण येते हो वेळोवेळ
जाऊबाईला स्वयंपाकाची
तयारी करावी लागणार
कंबर कसून कामासाठी
या वेळी मी तिथे नसणार
सोनपावलांनी येवून गौरी
सुंदर मखरात विराजतील
ज्येष्ठा कनिष्ठा सुंदरशा
जरीच्या साडीने सजतील
गौराई माते क्षमा कर आम्हा
सासू सासरे आहेत ना वृद्ध
त्यांना कुठलाही त्रास न होण्या
येणे आमचे करावे लागले रद्द
कुणालाही कुणामुळे सुद्धा
नको कुठला त्रास व्हायला
आपत्तीचा नायनाट करण्या
गौराई आली समृद्धी द्यायला
गौरी गणपतीच्या प्रार्थनेने
संकटाचे क्षण जातील निघून
पुढच्या वर्षी सण उत्सवाला
येवू आम्ही आनंदे सजून धजून
अनिता बर्गे भोसले
सातारा
उत्साहाचा सोहळा | gauri ganpati status
स्पर्धेसाठी
काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
दिनांक:-७/९/२०२३
विषय :- गौराई आली घरा
शिर्षक:- उत्साहाचा सोहळा

गौराई येता घरा
लेकीबाळींच्या आनंदा येई उधाण
होई सुरु उत्साहाचा सोहळा
तीन दिवसांचे गौराईंचे पूजन
सण महालक्ष्मीचा,गौरी-गणपतीचा
सुहासिनींच्या लगबगीचा
पोरीबाळी, सुनांचा नटण्याचा
गौराईंच्या पूजनाचा
करती सुहासिनी गौराईचे व्रत
अनुराधा नक्षत्रावर
होते गौराईचे आवाहन,
करती पूजन जेष्ठा नक्षत्रावर
हळदी कुंकूवाची उमटवून पाऊले
धान्याच माप ओलांडून
आली गौराई गौराई घरा
मन जाई किती आनंदून
जेष्ठा नि कनिष्ठा माझ्या
सजल्या भरजरी साड्या नेसून
सोन्या-मोत्यांच्या दागिन्यांनी सजून
दिसे ते गोजिर रुप किती शोभून
रांगोळीचा थाट,पानाफुलांची आरास
नैवेद्य भाजी भाकरीचा, पुरणपोळीचा
मांडली रास धान्यांची, फळांची
केले ताट फराळाचे,पंचपक्वानांचे
द्रष्ट काढूनी गौराईंची
लिंबलोण उतरूनी
रात्री करून जागरण
गौराईंची गाऊ गाणी
सुहासिनी आनंदें घेऊन लक्ष्मीचे दोरे
भरुन ओटी ,मनोमनी कामना करुन
कुटुंबाच्या सौख्याच दान
मागते सौभाग्याचं लेण.
सौं संंगिता अभंग
सातारा

गौराई माझी ऐक प्रार्थना आणि उत्साहाचा सोहळा | 2 Best gauri ganpati status
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह