Gauri Sanavar Marathi Kavita

गौराईची लेक आणि ज्योत चैतन्याची | 2 Best Gauri Sanavar Marathi Kavita

सौ. संध्या यादवाडकर आणि सौ. भारती गाडगिलवार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Gauri Sanavar Marathi Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

गौराईची लेक | Gauri Sanavar Marathi Kavita

काव्यबंध समूह आयोजित
काव्यालतिका
विषय —गौराई आली घरा
शिर्षक–गौराईची लेक

गौराईची लेक आणि ज्योत चैतन्याची | 2 Best Gauri Sanavar Marathi Kavita

माझी सानुली, लाडुली
गौराई आली हो ,गौराई आली||

बाप्पाच्या आगमनाच्या पाचव्या दिवशी दिमाखात घरी येई गौराई बाई
किती किती ,कसे कसे करू तिचे स्वागत तयारी करता करता होत असे घाई…१

रांगोळी सुरेख रेखली दारात
रंगीत शुभचिन्हांचीही दिली जोड
नानाविध रंगांच्या,सुवासांच्या फुलांनी
सजवली महिरप,नाही ठेवली खोड..२

गोट,पाटल्या,बांगड्यांचा हिरवा चुडा कर्णफुले,अंगठ्या बाजूबंदाने वाढे शोभा
मणी मंगळसूत्र,बोरमाळ,लक्ष्मी हार  नथीतल्या हिऱ्याची चेहऱ्यावर आभा..३

चंद्रकोर भालावरती मुखाला खुलवे
काजळ नयनांना तजेलदार बनवी
साजशृंगार झाला पूर्ण माहेरवाशीणीचा कौतुक सोहळा गौराईचे सौंदर्य वाढवी..४

पंचपक्वानांनी सजले ताट
वाफाळलेल्या भातावर साजूक तुपाची धार
धूप,उदबत्तीचा दरवळे सुवास घरभर
नैवेद्याच्या पानाभोवती महिरप पल्लेदार..५

साग्रसंगीत पूजा केली गौराईची
पाणवले डोळे तृप्त चेहरा पाहूनी
सौभाग्याच्या लेण्याचा आशीर्वाद असू दे
सदा कृपादृष्टी राहो, लेक तुझी मानुनी..६

सौ.संध्या यादवाडकर
ठाणे (पश्चिम).

ज्योत चैतन्याची | Gauri Sanavar Marathi Kavita

स्पर्धेसाठी
काव्यबंध समुह आयोजित काव्यलतिका स्पर्धा
दि : ७/९/२३
विषय : गौराई आली घरा
शिर्षक : ज्योत चैतन्याची

ज्योत चैतन्याची | 2 Best Gauri Sanavar Marathi Kavita

ती एक सोज्वळ मूर्ती
प्रेम, माया, ममता जिच्या अंगी वसते
संस्कार, संस्कृतीचे करते वहन
वेळ प्रसंगी सदैव मुखी हास्य असते….!१!

तिचे अस्तित्व अनन्यसाधारण
कुटुंबाप्रती अतुलनीय अमुल्य योगदान
जीवनाच्या चढ उतारांना सामोरे जाताना
स्व विकास साधत जपते आत्मसन्मान….!२!

पहाटेच तिचा सुरू होतो दिवस
नियोजन, नियमन, व्यवस्थापनाने
दिनचर्या आणि आरोग्यामध्ये
दुवा साधते प्राणायाम अन् योगासनाने…!३!

देखरेख घराची, मुलांचे, नवऱ्याचे,
सासु सासऱ्यांचे हवे नको ते बघते वेळेवर
आवडनिवड जपताना होते तारांबळ जरी
सदा हसतमुखाने माया करते सर्वांवर….!४!

संसारात राहूनही अद्ययावत ज्ञान
फेसबुक, व्हाॅटस् अपशी घेते जुळवून
तंत्रज्ञानाच्या युगात संस्कार, संस्कृतीमध्ये
समतोल राखते न जाता कोणा हुरळून…!५!

तिच्यात नवीन पिढी घडविण्याचे सामर्थ्य
विकासाच्या सर्व क्षेत्रात असते अग्रेसर
मन, कर्म नि वचनाने देश उन्नतीसाठी सक्रिय
अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यास सदैव तत्पर…!६!

आई, बहिण, मुलगी, स्वरूप  जरी भिन्न
प्रतिक मात्र शक्ती नि भक्तीचे भूतलावर
तीच दुर्गा, महालक्ष्मी, गौराई वसते घरोघरी
जागवत ज्योत चैतन्याची मनामनावर…!७!

सौ. भारती गाडगिलवार
चंद्रपूर

 Best Gauri Sanavar Marathi Kavita

गौराईची लेक आणि ज्योत चैतन्याची | 2 Best Gauri Sanavar Marathi Kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *