सौ. राधा खानझोडे आणि सौ. समीक्षा बाळासाहेब जामखेडकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Gauri Var Marathi Kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
गौराई येता सोनपाऊले | Gauri Var Marathi Kavita
काव्यबंध समूह आयोजित काव्य लतिका स्पर्धा..
दिनांक:-गौराई आली घरा..
दिनांक:-७/९/२०२३
शीर्षक:-गौराई येता सोनपाऊले…

गौराई येता सोनपाऊले
अंगणी रांगोळ्याचा थाट
फुलांचे तोरण दाराला
पाहू गौराईची वाट…!!१!!
घरा आलिया गौराई
हर्ष जाहला मनी
वाट बघते आतुरतेने
ओवाळू या सर्वजणी…!!२!!
गौराई आली घरा
आपल्या माहेरपणाला
चला करूया स्वागत
झाला आनंद मनाला…!!३!!
रूप सुंदर देखणे
दिसे तिचे अति भारी
गौराईच्या स्वागताने
आम्ही आनंदलो सारी…!!४!!
माझ्या गौराईला
साडी चोळी जरतारी
भाळी टिळा कुंकवाचा
नथ शोभे नाकावरी..!!५!!
अडीच दिवसाचं माहेर
हास्य फुलें तिच्या गाली
रूप गोजिरे सुंदर
प्रभा तेजाळली लाली..!!६!!
अनारसे ,करंज्यांचा
मध्ये फुलोरा बांधूया
विविध पक्वावानांनी
पान सुंदर सजवूया…!!७!!
चटण्या, भाज्या कितीतरी
गोड आंबिल करूया
मनोभावे पूजाअर्चा
गौराईला सजवूया…!!८!!
जागरण रात्री चाले
भजनी किर्तनी रंगूया
माझ्या माय माऊलीस
डोळा भरून पाहूया…!!९!!
चाले विविध खेळांचा
झिम्मा फुगडीचा रंग
गौराईच्या आगमनाने
भिजूनिया अंतरंग…!!१०!!
स्वरूप सुंदर माऊली
ठेव कृपाहस्त मजवरी
अखंड सौभाग्याचं लेणं
राहो मज आयुष्यभरी..!!११!!
माझा सुखी संसार
तुज मागणं मागते
सुखी ठेव साऱ्यांना
माथा चरणी ठेवते..!!१२!!
असू दे गौराई माते
कृपा सदा आम्हावरी
विनविते मी राधिका
छत्र छाया साऱ्यावरी…!!१३!!
सौ. राधा खानझोडे
नागपूर..
आली गौराई सोनपावली | Gauri Var Marathi Kavita
स्पर्धेसाठी,
काव्यबंद समूह आयोजित काव्यतिका स्पर्धा दिनांक 7 9 2023
विषय गौराई आली घरा
शीर्षक आली गौराई सोनपावली

पहिल्या दिवशी
गौरी आवाहन
जेष्ठा कनिष्ठा दोघी
दिसे सुंदरते ध्यान
सोन्याच्या पावलाने
आली गौराई घरा
मन प्रसन्न होई पाहून
भक्तीभावाने तिची पूजा करा
तिला नेसवा ग ,
जरी काठीची साडी
जेष्ठा कनिष्ठा दोघी
आहे महालक्ष्मीची जोडी
कपाळी टिळा नाकात नथ
हाती हिरवा चुडा लावा गजरा
तिच्या येण्याने उत्सव वाढला
तिचा तुम्ही साज शृंगार करा
रंगीत रांगोळी छान
तिच्यापुढे काढा पाऊले
जाई जुई शेवंती फुले
पूजेसाठी हो आणले
भाव भक्तीच्या करुनी माळा
त्यांना प्रेमाने वाहू
दृष्ट लागू नये म्हणून,
काळी टीट गाली लावू
करंजी, लाडू ,साटोरी ,अनारसा
गौराईला नैवेद्य पुरणपोळी
आरती ओवाळू मनोभावे
नतमस्तक त्यांच्या चरणाजवळी
भक्त होत असे पाहून
सुंदर जेष्ठा कनिष्ठा मूर्ती
सोबत बालगोपाल
काय वर्णावी त्यांची कीर्ती
भक्तास प्रसाद पेढा
हाती लक्ष्मीच्या तांबूल विडा
आशीर्वाद द्या भक्तासी तुम्ही
ओंजळीत पडू द्या सुखाचा सडा
सौ. समिक्षा बाळासाहेब जामखेडकर संभाजीनगर

गौराई येता सोनपाऊले आणि आली गौराई सोनपावली | 2 Best Gauri Var Marathi Kavita
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
गौराई येता सोनपाऊले आणि आली गौराई सोनपावली | 2 Best Gauri Var Marathi Kavita