सौ. वर्षा फटकाळे वराडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत good poem on aaji in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
good poem on aaji in marathi
स्पर्धेसाठी
काव्यबंध समूह आयोजित स्पर्धा
विषय आजीची छकुली
ओल नात्यांची | Good poem on aaji in marathi

रंग वैविध्य नात्यांचे
आजी बाबा नाते खास
स्पर्श जिव्हाळ्याचा फार
स्नेह वृद्धिंगत त्यास
जिची वात्सल्य झलक
करी प्रेम पखरण
ओल नात्यांची सुखावे
हेचि अमौलिक धन
पुण्य आशिष देऊनी
तारीयले संकटात
कोडकौतुकाचा घास
भरविला वदनात
लळा लाविला मनास
गोड स्वभावाची धनी
पिंगा घाली सभोताली
नसे एकाच आसनी
गाणी, खेळ खेळूनिया
शिकविला युक्तीवाद
चित्रपट कथांवरी
होई मोकळा संवाद
जोजवूनी मज तीच
गोष्टीतून बोध देई
शरीराचा शीण सारा
अलवार दूर नेई
खाऊ स्वतः बनवून
मज प्रेमे खाऊ घाली
जुने विचार सांगड
नव्या विचारांशी झाली
संस्कारांनी सुशोभित
ऐसे वर्तन ठेविले
आम्हां नातवंडांवर
तेचि पुन्हा बिंबविले
प्रिय आजीची छकुली
म्हणूनिया संबोधित
सारे शेजारी पाजारी
तिचा आदर करीत
सौ वर्षा फटकाळे वराडे ठाणे

good poem on aaji in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह