love poem on rain in marathi in 2024

सुर्यपुत्र | Best Gosht karnachi poem In 2024

विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Gosht karnachi poem In 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Gosht karnachi poem In 2024

काव्य बंध समूह आयोजित
काव्य लतिका रविवारीय काव्य स्पर्धा
विषय: महारथी कर्ण

सुर्यपुत्र | Gosht karnachi poem In 2024

होता जरी तो,
पंडू कुंतीचा पुत्र..
म्हणती त्यास
जग सारे सूर्यपुत्र..1

जन्मत:च होते अभेदय,
असे कवच संपूर्ण अंगावर..
अन कुंडले होती सुवर्णाची,
दोन्ही बाजूच्या कानावर…2

अधीरथ पालनकर्त्या पित्याने,
वसुसेन असे नाम ठेवले..
राधा मातेने सांभाळले त्यास ,
जगाने राधेय म्हणूनी ओळखले…3

कृपाचार्य यांनी विद्या
कर्ण शिष्यास शिकवली..
सारथीकन्या वृषाली अन,
राजकन्या सुप्रिया पत्नी जाहली..4

स्वयंवरावेळी द्रौपद्रीने केले सुतपुत्र,
म्हणून त्याचा भर सभेत अपमान…
पांडवांशी वाढले वैर अन
दुखावला गेला त्याचा स्वाभिमान…5

ब्राह्मण रूपातील इंद्र देवास,
दिले कवचकुंडले आपले दान..
त्याबदली इंद्राने दिले दानशूरास,
अमोघशक्ती हे अस्त्र अन बाण…6

ब्रम्हास्त्रप्राप्ती विद्येस दिला,
गुरु द्रोणाचार्यानी त्यास नकार..
ब्राह्मण बनूनी गुरु परशुरामा
करवी केला त्या विद्येचा स्वीकार..7

गरीब ब्राह्मणाच्या चिखलात
अडकलेल्या गोहत्याचे पाप घडले .
त्या शापामुळे युद्धावेळी रथाचे,
चाक चिखलात अडकले..8

कुंतीमातेने, श्रीकृष्ण तसेच भीष्माने
त्यास पांडव असल्याचे समजावले..
पण दुर्योधनाने केलेल्या मैत्रीची
उपकाराची जाण ठेवून सारे धुडकारले..9

सतराव्या दिवशी गाठ पडली,
अर्जुनाशी त्याची रनांगणावर..
रथाचे चाक रुतले चिखलात
शापामुळे ब्रम्हास्त्र न आठवले वेळेवर..10

असला जरी पांडवपुत्र क्षत्रिय,
पाऊले चुकीची संग असंगाशी..
वाईट नीती अन चुकीच्या वागण्याने
मुकला आपल्या जीवाशी..11

महारथी पराक्रमी म्हणूनी,
अजरामर कर्ण इतिहासात..
दानशूर, सच्चा मित्र असे
उदाहरण कर्णाचे कौतुकाने देतात…12

✍🏼 श्री. विजय तानाजी पाटील (तासगाव ) ✍🏼

Gosht karnachi poem In 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *