वीणा पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत grandchildren in marathi kavita विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
grandchildren in marathi kavita
काव्य बंध समुह आयोजित स्पर्धा..
विषय… आजीची छकुली
माझी लाडुली grandchildren in marathi kavita

नात झाली हो,अहो मला नात झाली
आजी झाले हो,आनंदाने ऊर भरून आला
गोरी गोरीपान गोबर-या गालाची नात
काय सांगू,तिने वेड लावले घरादाराला…..1
जन्मली पोर ग किती किती ती भाग्याची
माझी छकुली कुठे ठेवू कुठे नको वाटे लागायला
गुड्डी गुड्डी बोलवता दुडूदुडू धावत
पटकन यायची मला बिलगायला….2
होऊ लागली ती जसजशी मोठी
काय सांगू तिचा भारीच चालला नखरा
नाक उडवून सर्वाना हसवत रहायची
तिच्यावरती खिळून राहीत सर्वांच्या नजरा….3
बघता बघता लागली शाळेत जायला
रिक्षा येता धावतच दारात जायची
सॅक अडकून बाय…बाय करायची
मी आपली टक लावून पहातच बसायची….4
शाळेतून यायची आजी..आजी करतच
घट्ट मला मिठी मारून बोलणार
आज बाईनी शाबासकी दिली
लाडे लाडे गुजगोष्टी करणार….5
आजीची छकुली आता लग्न होऊन
एका मुलाची आई सुध्दा झाली
डाॅक्टर होऊन काॅलेजवर प्राध्यापक
आणी सायंकाळी क्लिनिक चालवूलागली…..6
लाडुली माझी ग अजून वाटे छकुली
दररोज न चुकता फोन ती करते
फोन वर खूप खूप गप्पागोष्टी मारते
फोन नंतर मी ठेवून बालपण आठवत बसते…
वीणा पाटील
कोल्हापूर
grandchildren in marathi kavita
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह