सोमदत्त कुलकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत grandfather poem in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
grandfather poem in marathi
आजोबांचा लाडला | grandfather poem in marathi

आजोबांचा लाडला
सेल्फी छान काढतो
चेहेऱ्यावर त्याच्या
आनंद झळकतो १
आजोबा नित्य सांगती
नातवाला गोष्टी छान
त्यांच्या गोष्टी ऐके
बाळ डोलवुनी मान २
वेगवेगळ्या गोष्टी
महाभारतातील छान
सांगत होते आजोबा
विसरून सर्व भान ३
खरंच बाळ भाग्यवान
असे आजोबा मिळाले
जगण्याचे तंत्र मंत्र
त्यांनीच खरे शिकविले ४
खरे किती, काय सांगू
आजोबांची असीम माया
सांगती नातवाला बेटा
नको घालवू क्षण वाया ५
आजोबा मजला घरात
देवाच्या रूपात भासले
वाटते भाग्य रूपात
आजोबा घरी अवतरले ६
आजोबांचे प्रेम, माया
कशी शब्द बद्ध करावी
शब्द मौन झाले आज
किती आठवण काढावी ७
आजोबा नातवाचे नाते
असते खरे अतूट प्रेमाचे
जसे असते नाते एका
माय अन तिच्या लेकराचे ८
सोमदत्त कुलकर्णी
कोल्हापूर
grandfather poem in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह