गोविंद कुलकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत grandparents poem in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
grandparents poem in marathi
स्पर्धेसाठी
काव्य बंध समुह आयोजित
साप्ताहिक चित्र चारोळी स्पर्धा
दिनांक. १४/९/२०२३
विषय : आजी आजोबांचा छकुला
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
धकुला छकुली grandparents poem in marathi

लडीवाळी छकुला छकुली
आई बापाच्या सुख स्वप्नांची आजी आजोबांच्या ममतेची
नाना नानींच्या अभिमानाची ..१
नाना नानी असे प्रेम धन
छकुला छकुलींच्या जीवनी
नाना नानीच्या आयुष्यातील
छकुला छकुलीं संजीवनी…२
चिमुकल्या पावलांनी येती
छकुला छकुली जीवनात
आजोबा आजींच्या छत्राखाली
प्रेमगुटी मिळे प्राकृतात….३
छोट्या छकुला छकुली संगे
आजोबा आजी लहान होती
इवल्या इवल्या गालातून
खट्याळपणे गोड हासती….४
इवल्या इवल्या डोळ्यातून
प्रेम कटाक्षाने झाकाळती
चंद्र चांदण्या दाखवताना
नाना नानी मात्र सुखावती…५
आजी आजोबां नाही करत हेळसांड त्यांच्या संस्कारात
नातवंडांना शिकवताना
भेदभाव नाही जोपासत….६
नातं नातवंडांच असत
प्रेम स्वरूपाच्या वात्सल्याचं
आजी आजोबांच्या काळजीच
नातवंडांच्या स्वावलंबाच.. ७
छकुला छकुली मोठे होती
आजी आजोबां सुखी पाहती
छकुला छकुली सेवा देती
नाना नानी तृपतता मानती…८
(C)(R)
गोविंद कुलकर्णी
नौपाडा ठाणे
grandparents poem in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
Mast Kavita
सुंदर
बालकाव्य खूप छान,भाषा साधी,सोपी, बालविश्वाची आणि
लय पकडणारी अशी छान.
सुंदर कविता