green diwali clean diwali poem

दिपावली आणि दिवे लावू | 2 Best green diwali clean diwali poem

रमेश अनंत चव्हाण आणि राजू लक्ष्मण उदमले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत green diwali clean diwali poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

green diwali clean diwali poem

📙📘 काव्यबंध समूह📗📕
आपल्यासाठी घेऊन आले आहेत
काव्यलतिका
प्रत्येक रविवारीय होणारी स्पर्धा
दिनांक:- २९/१०/२०२३
विषय :- सण दिव्यांचा

दीपावली | green diwali clean diwali poem

दिपावली आणि दिवे लावू | 2 Best green diwali clean diwali poem

लक्ष दिव्यांचे तोरण लावून दारी
रांगोळी फुलांची करून उधळण
पसरतो उटण्याचा सुगंधी दरवळ
घेवून आनंद आला दिवाळी सण!!१!!

धनत्रयोदशी ने होते आज सुरवात
आज घरोघरी उजाळीत दिपपर्वाची
राहुनी सदैव लक्ष्मी सुखाने घरी
दीपावली येवो सुख आणि समृद्धीची!!२!!

अश्विन अमावस्येच्या दिनी
होत असे लक्ष्मी देवीचे पूजन
व्हावी बरकत घरी धन धान्याची
म्हणून होते कुबेराचेही पूजन!!३!!

तारले श्रीकृष्णांनी जसे सहस्त्राना
नरकासुराच्या त्या पाशातूनी
नरकचतुर्दशीच्या शुभ दिनी यावे
नवचैत्यनाचे नव किरण जीवनी!!४!!

कार्तिक शुद्ध प्रतिपदा ह्या दिनी
आहे सण खास बलिप्रतिपदा
बळीराजाचे होता शुभदिनी पूजन
आपल्या घरी सुख शांती नांदे सदा!!५!!

भाऊबीज आली सण भाऊ बहिणीचा
ओवळण्या पंचारती भाऊरायासाठी
सातजन्माचे हे नाते विश्वासाचे अतूट नाते
मायेने जिव्हाळ्याने होतात भेटीगाठी!!६!!

दिव्याच्या प्रकाशाने उजलीत पहाट
आनंदाने बहरतो खास क्षण आजचा
घेऊन जीवनी नवचैतन्याची लाट
आनंदाचा हा आहे सण दिव्यांचा!!७!!

रमेश अनंत चव्हाण
तोंडली मंडणगड

green diwali clean diwali poem

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका
दि.२९/१०/२०२३
विषय-सण दिव्यांचा

दिवे लावू | green diwali clean diwali poem

दिवे लावू | 2 Best green diwali clean diwali poem

दिवे लावून ज्ञानाचे
अज्ञानाचा अंधार दूर करू
वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळून
परंपरेची जपवणूक करू

दिवे लावून न्यायाचे
अन्यायाला चारू माती
सगे सोयऱ्यांसोबत
जपूया आपुलकीची नाती

दिवे लावून श्रद्धेचे
अंधश्रद्धेला दूर सारू
देशाची प्रगती करण्यासाठी
नवनवीन ज्ञान प्राप्त करू

दिवे लावून भक्तीचे
पापी शक्तीला दूर करू
भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याचा
मनाशी पक्का निर्धार करू

दिवे लावून पुंण्याचे
पापाचा करू घात
गोरगरिबांची सेवा करण्यासाठी
सतत देऊ मदतीचा हात

दिवे लावून मैत्रीचे
दुष्मणीचा करू जाळ
समता,ममता,बंधुता,एकता
यांची गुंफूया सुंदर माळ

दिवे लावून समतेचे
सर्वधर्मसमभावाचा घेऊ वसा
जातीभेद,धर्मभेद,वर्णभेद,लिंगभेद
न पाळण्याचा मनावर उमठवू ठसा

दिवे लावुन विश्वासाचे
अविश्वासाला लावू पळून
अज्ञान,अन्याय,अंधश्रद्धा,भेदभाव,दुष्मणी
जाईल दिव्यामध्ये कायमची जळून

✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
राजू लक्ष्मण उदमले
राहुरी, अहमदनगर

Best green diwali clean diwali poem

green diwali clean diwali poem

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह