वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Happy Birthday Poem in Marathi

वाढदिवस म्हणजे सर्वांच्या आयुष्यातील स्पेशल दिवस. या दिवशी सरळ साधे मेसेज पाठवून शुभेच्छा देणे म्हणजे अगदीच बोरिंग पद्धत आहे. आपल्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनोख्या कविता. चला तर मग बघूया. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता.

मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आला आला वाढदिवस ,माझ्या सोनुल्या बाळाचा
खेळता खेळता त्याच्याशी, विसर पडला वर्षांचा
छोटासा छकुला माझा, आता झाला वाढत्या वयाचा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा, सदा होत राहो वर्षाव तुझ्यावरी यशाचा…..

———————————

आज जल्लोष करूया, जिकडे तिकडे चोहीकडे फिरुया, मज्जा मस्ती करूया…
तुझा वाढदिवस आज, आपण असाही साजरा करूया…
बाळा तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
तुला उदंड आयुष्य लाभो हीच सदिच्छा….

———————————

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

माझ्या दुःखात तुझे डोळे पाणावतात
काटा जरी मला रुतला तरी वेदना तुला होतात
अगं आई खरचं तुझ्या सहवासात असलं की
आयुष्यातील सारेच दिवस आनंदात जातात
तुझ्यासारखी आई सर्वांना मिळू दे
सातही जन्म तुझ्याच पोटी माझा जन्म होऊ दे
तुझ्या वाढदिवसानिमित्त मी देवास एकच मागतो
तुला उदंड आयुष्य लाभू दे…

———————————

माझ्या आईने मला आयुष्यात, कधी रडु दिलं नाही
सतत हसत ठेवत असते ती मला, काहीच कमी पडू दिलं नाही
आईला वाढदिवसाच्या खूप खुप शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | happy birthday poem in marathi

नातेवाईक किंवा मित्राला लग्नाच्या वाढदिवस हार्दिक शुभेच्छा

दोन अनोळखी माणसे एकत्र आली, की त्यांची दोन मन जुळतात
आणि मन जुळली की, त्यांचे नाती जुळतात
जशा अनोळखी अशा नद्या, समुद्राला येऊन मिळतात
तशाच या नात्यांच्या समागमाला लग्न असे म्हणतात…..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

———————————

एकदा झालेलं तुमच्या मधलं प्रेम, हे कधीच अर्धवट राहू नये
तुम्ही केलेला एकमेकांवरचा विश्वास, हा कधीच तुटू नये
एवढंच देवाकडे मी प्रार्थना करतो
आणि तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | happy birthday poem in marathi

———————————

Husband ला लग्नाच्या वाढदिवस हार्दिक शुभेच्छा

आपल्या लग्नाला एवढे वर्ष लोटून गेली, हे कधी मला कळलंच नाही
तुझ्या सहवासात आयुष्य घालवतांना, कशाचाही कमीपणा जाणवलंच नाही
प्रत्येक पुरुषा मागे, एक स्त्री असते असे म्हणतात
पण माझ्या मागे, तुम्ही खंबीरपणे नेहमी उभे रहातात
असच आयुष्यभर साथ राहू द्या हीच सदिच्छा
तुम्हाला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

———————————

खूप उपकार आहेत त्या देवाचे, ज्यांनी मला तुमची भेट घालून दिली
याच दिवशी तुम्ही माझी कुंकवाने भांग भरून दिली
तुम्हाला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

———————————

बायकोला लग्नाच्या वाढदिवस हार्दिक शुभेच्छा

आलीया माझ्या सदन
साता जन्माचे बांधून बंधन
सुगंध दरवळूण माझिया आयुष्यात
तू झालीया माझ्यासाठी चंदन
तुला नेहमी आनंदात ठेव
देवाकडे मागतो मी हे एकच वचन
तुला आपल्या लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

———————————

अर्धांगिनी म्हणतात तुला
पण तू माझी पूर्णांगिनी आहेस
आई नंतर मला प्रेम करणारी
जणू तू ही एक जननी आहेस
माझं मन जपणारी तू
माझी मनधरणी आहेस
तुला माझं ही अर्ध आयुष्य लाभू दे
आणि देवाच्या कृपेने तुझी साथ कायम मिळू दे
तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज वाचण्यासाठी क्लिक करा.

Read Diwali शुभेच्छा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *