happy diwali poems in marathi

दीप ज्योत आणि नवा उमंग नवा उत्साह | 2 Best happy diwali poems in marathi

अनिता भोसले बर्गे आणि सौ. राधा खानझोडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत happy diwali poems in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

happy diwali poems in marathi

काव्यबंध समूह
काव्य लतिका स्पर्धा

दिनाक 29/10/2023
विषय सण दिव्यांचा..

दीप ज्योत | happy diwali poems in marathi

दीप ज्योत आणि नवा उमंग नवा उत्साह | 2 Best happy diwali poems in marathi

स्वयंप्रकाशे प्रकाशित व्हावे।
ज्ञानी होऊनी जीवन जगावे।
सेव्य न जे ते दूर करत रहावे।
योग्य जे ते कर्म करत रहावे।

सुर्यकिरण सोनेरी
फुलली सोनेरी पहाटअंगणी
गंधीत सुमनांच्या दारी अशी
आली दिवाळी रंगात रंगुनी

नक्षीदार रांगोळी
तुळस हसली वृंदावनी
अंब्याचे तोरण सांगे कानी
सण दिवाळीचा देई संजीवणी

फुलापानांची आरास
आकाशदिव्यांच्या प्रकाशात
स्नेहाची पणती उजळतांना
तारकांची दिवाळी आकाशात

सुगंधी अभ्यंगस्नान
फराळांचा अस्वाद जीभेवरी
आनंदाचे, उत्साहाचे रंग लेवून
नटली, सजली दिवाळी धरेवरी

लक्ष्मीपुजनाचा थाट
अतिशबाजी फुलवी नभांगण
प्रसन्नतेचे लाभता वरदान असे
दिव्यत्वाचे दिवाळीला आंदण

नात्यांच्या भेटीगाठीत
पाडवा, भाऊबीज मर्मबंधाची
निरांजणाची ज्योत तेवणारी
हृदयस्थ दिवाळी रेशीमबंधाची

तिमीरातूनी तेजोमय
दिपज्योतीचा होई सन्मान
दूर करी जीवनाचा अंधःकार
देवतांना दिवाळीचा अभिमान

दीप बघता मन उजळावे।
जगी सर्वांवरती प्रेम करावे।
मोह पाशातून मुक्तच व्हावे।
अहंकाराचे कौतुक न व्हावे।

दिवाळी पासूनी सौख्य मिळावे।
साऱ्यांना आरोग्य वरदान असावे।
इच्छित सारे नित परीपूर्ण व्हावे।
आनंद भुवनी सदैव रत असावे।

अनिता भोसले बर्गे
सातारा

happy diwali poems in marathi

काव्यबंध समूह आयोजित काव्य लतिका…. स्पर्धा…

दिनांक:-२९/१०/२०२३
विषय :-सण दिव्यांचा..

नवा ऊमंग नवा उत्साह | happy diwali poems in marathi

नवा उमंग नवा उत्साह | 2 Best happy diwali poems in marathi

सन दिव्यांचा हो आला
आहे पर्व आनंदाचं
सगळ्या सणांमध्ये सण
नवा गंध नव्या उत्साहाचं….!!१!!

राशी सजल्या दिव्यांच्या
माझ्या गं अंगणात
अंधःकार दुर सारा
घ्यावा प्रकाश मनांत…!!२!!

दिव्यांच्या प्रकाशाने
आसमंत उजळला
सोनेरी किरणांचा प्रकाश
अंतरंगी उमटला…!!४!!

मीन मीन दिव्यांच्या पणतीने
जशी आरास सजली
सोनेरी किरणाचा साज
लेऊन वसुंधरा लाजली…!!५!!

रांगा लागल्या दिव्यांच्या
रांगोळीचे पडती सडे
नव्या पर्वाची उधळण
घेऊ नव्या संकल्पचे धडे..!!५!!

लख्ख प्रकाश रोषणाईने
घरी लक्ष्मी अवतरली
मंजूळ नादाच्या लहरीने
दिवाळी पहाट उगवली…!!६!!

आल्या आल्या माहेराशी
लेकी दिवाळं सणाला
उधळण प्रेमाची करून
झाला आनंद मनाला…!!७!!

भाऊबीजेच्या सणाला
लेक माहेराशी आली
मायेच्या ओलाव्यांने
नखशिखांत ही न्हाली…!!८!!

दिवाळीच्या देऊ शुभेच्छा
झाला आनंद सर्वांना
सर्व सणांमध्ये सण
खास दिवाळी पर्वाना…!!९!!

सौ. राधा खानझोडे, नागपूर…

Best happy diwali poems in marathi

happy diwali poems in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह