Happy fathers day poem in marathi

बाप | Best Happy fathers day poem in marathi in 2023

सौ. भारती राजेंद्र बागल यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत happy fathers day poem in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

happy fathers day poem in marathi

काव्यबंद समूह आयोजित काव्य लतिका स्पर्धा
दिनांक 15 ऑक्टोबर 2023

बाप | happy fathers day poem in marathi

अखंड जळत राहणारा
देव्हाऱ्यातील नंदादीप
संकटाला फिरकू देत नाही
कुटुंबाच्या समीप

पुरविण्या इच्छा कुटुंबाच्या
करतो जगाची चाकरी
तिन्ही ऋतुंशी सामना
घालतो सुखाची भाकरी

परीसासन बाप
करवितो आयुष्याचं सोनं
त्याच्याविन नक्कीच असतं
जग सार सुन

चार भिंतींच्या कुटुंबातला
देव हाच जाणावा
रात दिसा राबणारा
ईश्वर ठायी मानावा

तोच एक असतो
खराखुरा आधार
त्याच्या विना वाटतं
जीवन हे निराधार

आकार देणारा जीवनाला
तोच असतो शिल्पकार
नीती मूल्यांसाठी होतो
कधी कधी कठोर फार

तोच असतो कल्पवृक्ष
इच्छापूर्ती करणारा
संकट समयी ढाल बनवून
पुढे उभा राहणारा

लेकरांची चिंता
नित्य असते मनात
त्यांच्यासाठी घालवतो
जन्म अवघा कष्टात

दुःख पाहून कुटुंबाचं
घालमेल होते जीवाची
घर सुरक्षित ठेवते
चौकट बापरूपी देवाची

वेदनेची सल उरी
आनंदाने पेलतो
इच्छा पुरवण्या लेकरांच्या
तिन्ही ऋतू झेलतो

आकाशीच्या घारीसम
लक्ष त्याचे कुटुंबावर
आनंद उधळून घाव दुःखाचे
घेई तो छातीवर

बाप | Best Happy fathers day poem in marathi in 2023

happy fathers day poem in marathi

एक एक क्षण आयुष्याचा
कुटुंबावरती उधळतो
दुर्लक्षित तरीही तो
प्रसन्नतेने वावरतो

मन मारून स्वतःचे
गरजा भागवतो साऱ्यांच्या
बापाच्या चौकटीविन
निरोपयोगी भिंती घराच्या

आतून खचला जरी
वरून कणखर राहतो
लोण्यासमन नरम जरी
कठोर साऱ्यांना वाटतो

ईश्वरही असतो
भक्तीचा भुकेला त्याहुनी निरपेक्ष
समजावे बापाला

सौ भारती राजेंद्र बागल
वडूज सातारा

happy fathers day poem in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *