सौ. सुवर्णा बाबर आणि सौ. प्रिया गौरव भांबुरे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Happy Raksha Bandhan Marathi Quotes विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Happy Raksha Bandhan Marathi Quotes
सण रक्षाबंधनचा | Happy Raksha Bandhan Marathi Quotes
काव्य बंध समूह, काव्यलतिका..
दिनांक- 17/8/2023
विषय – रक्षाबंधन

बहिणीच्या मायेचा
भावाच्या प्रेमाचा
सण जीव्हाळ्याचा
दिवस हा रक्षाबंधनचा ..१
सण हा नारळी पौर्णिमेचा
बहिण-भावाच्या प्रेमळ नात्याचा
येती कैक संकटे, भीती कशाची
साथ आहे नेहमीच भाऊरायाची ..२
नेत्रांची नीरंजने ओवाळीते भाऊराया
नकोत उंची कपडे, नकोत दाग-दागिने
राहूदे अशीच आम्हावरी मायेची छाया
रहा उभा पाठीशी एवढेच मागणे ..३
आहे दृढ बंध हा बहीण-भाऊ नात्याचा
रेशीम धागा हा अतुट प्रेमाचा
दिर्घायुष्य लाभो तुजला
हवे अजून काय मजला ..४
तूच माझा पाठीराखा
तूच माझा पहिला सखा
येऊ दे आपुल्या प्रेमास भरती
होईल सदैव दुःखाची ओहोटी ..५
औक्षवंत हो, किर्तीवंत हो
मागणं हेची इश्वर चरणी
कृष्ण उभा पाठीशी द्रोपदीच्या जसा
माझा पाठीराखा तू तसा ..६
आई-बाबांच्या माघारी मायेचा
ओढा आहेस रे तू भाऊ राया
ओढीने त्याच वट पाहूनी सालभर
पहा आले मी बंधाया राखी तया ..७
येईन दारी तुझ्या मायेच्या ओढीने
बांधेन राखी विश्वासाच्या नात्याने
कर पाठवणी माझी पुन्हा एकदा
प्रेम भरल्या ओंजळीने ..८
सौ. सुवर्णा बाबर, पुणे
रक्षाबंधन | Happy Raksha Bandhan Marathi Quotes
काव्यबंध समूह, काव्यलतिका
दिनांक-१७|८|२३

घरासाठी,भावंडासाठी
जो झिजत असतो
जबाबदारीचे ओझे वाहत
दिवस रात्र राबत राहतो
कोडकौतुक, हौसमौजची
कधी अपेक्षा करीत नाही
आयुष्य सारे कष्टामध्ये
खस्ता खात जो घालवी
बाबाच्या मागे बाबा होतो
आई सारखी माया जो देतो
आम्हां लहान बहीणीची
पाठीमागील सावली होतो
त्याच्या प्रत्येक गोष्टींची
कदर करायला पाहिजे
थोरल्या भावाचे महत्व
वेळेला जाणले पाहिजे
म्हणुन तर,.
निमित्त ह्या राखीचे असते
जुन्या त्या आठवणी रमवुन
परत बालपण अनुभवायला मिळते
स्वरचित
सौ प्रिया गौरव भांबुरे
तळेगाव दाभाडे पुणे
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह