सौ. सुनिता जयदीप पाटील आणि सौ. संजना पाटील यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Happy Raksha Bandhan Marathi Sms विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Happy Raksha Bandhan Marathi Sms
बहिण भावाचे प्रेम | Happy Raksha Bandhan Marathi Sms
काव्यबंध समूह
काव्य लतिका स्पर्धा
विषय :- रक्षाबंधन
दिनांक :-17/8/2023
काव्यप्रकार :- आठोळी

नाव नारळी पौर्णिमा
सण रक्षाबंधनाचा
उत्साहाचा मंगल्याचा
भाऊ आणि बहिणीचा !!1!!
शोभून दिसते राखी
भावाच्या हातावरच
बंध रेशमी बांधण्या
बहिणीचे दोन्ही कर !!2!!
आतुरतेने वाट पाही
कधी येतो भाऊराया
हाताने बनवलेली
नारळाची बर्फी खाया !!3!!
लहानपणी माहेरी
खूप मस्ती होती केली
भावाला दारी पाहून
गहिवरून ती गेली !!4!!
माहेरच्या आठवणी
भावाबरोबर आल्या
हर्ष उल्हासित सर्व
मनात न्हावून गेल्या !!5!!
राखी कलई पाहून
भाऊ जाई भारावून
वाजत राही भावाच्या
मनी हर्ष भरी धून !!6!!
बहीण भावाच्या प्रेमा
कोणी नजर ना लाओ
समुद्रापार भावाची
यश अन कीर्ती जावो !!7!!
भावाच्या मनोकामना
पूर्ण व्हाव्या सर्व इच्छा
निरागस मनानेच
बहीण देते सदिच्छा !!8!!
घेऊन येतो उल्हास
सन रक्षाबंधनाचा
ठाव लागतच नाही
दोघांच्या अंतकरणाचा !!9!!
रक्षाबंधनाची वाट
बहीण रोजच पाही
येता भाऊ अंगणात
हर्षाने धावत जाई !!10!!
जगी बहिणींना वाटे
भाऊ पाहून दारात
रक्षाबंधन रोजच
यावे प्रत्येक घरात !!11!!
दिवसभरानंतर
निघण्याचा क्षण येतो
पानावलेल्या डोळ्यांनी
भाऊच निरोप देतो !!12!!
बहिणीच्या अंतरात
हुंदका दाटून येतो
मिठीत घेऊनी भाऊ
अश्रूंना ओघळू देतो !!13!!
बहीण भावाच्या प्रेमा
जगी अमरत्व आले
म्हणूनच रक्षाबंधन
अविस्मरणीय झाले !!14!!
✍️सौ सुनीता जयदीप पाटील
कल्याण मुंबई
रक्षाबंधन….Happy Raksha Bandhan Marathi Sms
काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका स्पर्धेसाठी …
दिनांक १७/८/२०२३
विषय : रक्षाबंधन
शब्द मर्यादा : १०० ते १५० शब्द

नाते अतूट विश्वासाचे
बहीण भावाचे अनोखे
चेहऱ्यावरील भावावरून
दुःख की सुख ओळखे…१
खेळलो दोघे अंगणभर
कित्ती दंगामस्ती केली
रक्षाबंधन येताच
दोघांची गट्टी जमली….२
त्यादिवशी भाऊराया
किती गुणी असतो
बहिणीसाठी मात्र
काही तरी गिफ्ट आणतो….३
काळानुरूप दोघेही
थोडे ईयत्ता पुढे जातो
लहान भाऊ आज
आपल्यासाठी मोठा होतो…४
काळजी ,सोबत ,प्रेम
नकळत गाजवतो
ताईचा मान मात्र
तितक्याच आदबीने जपतो…५
रक्षण करावे ताईचे
आपसूक त्यास उमगते
जबाबदारीचे ओझे कसे
नसांगतच खांद्यावर येते…६
कधी कधी रस्त्यावरून जाताना
संरक्षक कवच बनतो
कळत नाही मलाच
भाऊ कधी दादा होतो…७
सासरी जाताना ताई
अश्रू हळूच लपवत असतो
समोर ताई येताच
लहान बाळा सारखा रडतो…८
होतो मोठा कर्तुत्वाने
पण ताईची ढाल कायम लागते
बाबांना मनवण्यासाठी स्वारी
विनवण्या मात्र माझ्या करते…९
नाही कधीच म्हंटले एकमेकास
जमेची बाजू हीच असते
देण्या घेण्याचा प्रश्न आगळा
प्रेमातच सगळे येते…१०
असेच असते नाजूक नाते
हिऱ्या माणीकांनी नटलेले
त्याही पेक्षा भरभरून
प्रेमाने ओथंबलेले…११
सण नवलाईचा बंधनाचा
नाव तयास रक्षाबंधन
लाडक्या भावामुळेच
आयुष्याचे झाले नंदनवन…१२
सौ संजना पाटील
कोल्हापूर
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह