संजय जाधव अंबरनाथकर आणि प्रा. नागेश सोपान हुळवले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Happy Raksha Bandhan Marathi Wishes विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
आधार | Happy Raksha Bandhan Marathi Wishes Kavita

श्रावण सरीत
सणांची मांदीयाळी
नारळी पौर्णिमा
बहीण भावाला ओवाळी
सण रक्षाबंधनाचा
बहीण भावाचा
पवित्र नात्याचा
सण आनंद उत्साहाचा
औक्षण करी
बहिण भावाला
धावून ये सदा
माझ्या संकटाला
आधार तुझा
असु दे मला
हिच विनंती
करते तुला
भाऊ देई वचन
बहीण रक्षणाचा
बंध रेशमी धाग्यांचा
क्षण जिव्हाळाचा
नाते बहिण भावाचे
ज्ञानेश्वर मुक्ताईचे
असे जीवा भावाचे
विश्वासाचे प्रेमाचे
सण अतुट नात्याचा
कधी कडू क्षणांचा
रूसव्या फुगव्याचा
कधी गोड आठवणींचा
सण उत्सव संस्कृती
भारतीय परंपरेची शान
सणात सण असे
रक्षाबंधनाचा मोठा मान
सण रक्षाबंधनाचा
संदेश मना मनाला
जपा आपल्या नात्याला
आधार द्या एकमेकाला
*✍️संजय जाधव अंबरनाथकर जि.ठाणे*
Happy Raksha Bandhan Marathi Wishes
बहीणीची वेडी माया | Happy Raksha Bandhan Marathi Wishes

श्रावणाचा आला मास बहीणीची वेडी माया माहेराची लागे आसभेटावया भाऊराया … १
नको तो पैसा अडकाराखी बांधते भावालासख्या लहाणपणीच्या त्यांच्या हो गळा भेटीला .. २
वेडी ही माया ममतापुण्य असंख्य जन्माचेओल जपण्या नात्याची बंध रेशमी धाग्याचे … ३
ताटामध्ये निरांजन मुखी गोड भरवतेसुखी समाधानी भाऊकर देवाला जोडते … ४
देई कर्तृत्वा प्रेरणाआठवांचा हा सोहळा दिन होते सुखी सारेबंधुराया माझा भोळा … ५
माझ्या रक्षणाला भाऊएका हाकेला धावतोचिंता नसते मनालादिन सुखाचा असतो… ६
आई बापाला नसेघोर कसला जीवालाभाऊराया वाही भार माझ्या साऱ्या आनंदाला…. ७
भाऊ माझा सांगे सदाकथा पवित्र नात्याचीहृदयांना जोडणाऱ्याअनमोल त्या धाग्याची … ८
एक राणी कर्मावती हुमायुस राखी देईपळे बहादुरशहाइतिहास गुण गाई …. ९
भारतीय संस्कृतीतभाऊ बहिणीचा सणपवित्र रक्षाबंधनआनंदाचे असे क्षण … १०
ज्याला नाही बहीणद्यावा आदर स्त्रीयांना तुळशीला प्रदक्षिणासाभांळावे भावनांना …११
*प्रा. नागेश सोपान हुलवळे*डोंबिवली
Happy Raksha Bandhan Marathi Wishes
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह