Happy Raksha Bandhan Marathi

बहिणीची माया आणि बहिणीला आसरा | 2 Best Happy Raksha Bandhan Marathi Poem

मुकेश मुकिंद स. वानखेडे आणि जयद्रथ आखाडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

बहिणीची माया | Happy Raksha Bandhan Marathi Poem

बहिणीची माया आणि बहिणीला आसरा | 2 Best Happy Raksha Bandhan Marathi Poem

****
परिवार असतो सुखी
जिथे आई वडिलांची छाया
भाऊ असे आनंदी सैदेव जिथे
मिळे त्यास बहिणीची माया….१

बालपणी बहिणीचे रुसने
आवडी सर्व भावंडाना
कौतुक बघती आई बाबा
उजाळा देई भावनांना…२

दूर असता भाऊ परदेशी
वाट पाही ती प्रत्येक दिनी
कधी येईल सामोरी एकदाचा
विचारात असे ती मनोमनी…३

बहीण भावाचे पवित्र नाते
ऋणानुबंध असते जन्माचे
शेवटच्या क्षणापर्यंत टिकविने
धोरण असावे हेची आयुष्याचे…४

आस लागे दोघांनाही अतूट
रक्षाबंधन या पवित्र सणाची
वर्षातुन एकदाच येई हा दिन
आठवण ठेवी अनमोल क्षणाची…५

मुकेश मुकिंद स. वानखेडे नागपूर


बहिणीची माया आणि बहिणीला आसरा | 2 Best Happy Raksha Bandhan Marathi Poem

बहिणीला आसरा

2 Best Happy Raksha Bandhan Marathi Poem

बहिणीची माया आणि बहिणीला आसरा | 2 Best Happy Raksha Bandhan Marathi Poem

बहिण भावाच्या नात्यातला
कणखर धागा रक्षाबंधन
उभा पाठीशी हा भाऊराया
करण्या बहिणीचे संरक्षण …..१

परंपरेने चाललेला हा उत्सव
जोपासणारा संस्कृती,चालरीत
धाग्यात असते शक्ती भरपूर
रक्ताचे नाते टिकण्या बंधू प्रीत …२

रक्ताचे नसले तरीही बहिण नाते
असतात मनाने मने मिळणारी
परकीही होतात मग सोबती
सख्ख्या नात्याहूनही जूळणारी ..३

सुतात विणलेली ही साधी राखी
प्रेमाने घट्ट मनगटास आवळती
सुटू नये कधीच, स्नेहाची गाठ
त्यातून पाझरे, आपुलकीची मती …४

बहिणीची भावावर वेडी माया
गेली जरी नांदण्यास ती सासरी
पडले जरी दोघांचे रहाण्यात अंतर
तरी रक्षाबंधनास येते ती माघारी …५

श्रावणात येतो सण, रक्षाबंधन
लहान मोठ्यांचा आनंदी क्षण
दोन जीवांचा असत़ो सन्मान
पवित्र बंधनात,जूळवतो मन …६

जरी नसली सख्खी ती बहिण
मानलेल्या बहिणीला देतो मान
तिचा असतो,ह्रदयातून जिव्हाळा
नाही घेतली जरी, शपथेची आन …७

जरी असली बहिण, दूर परदेशी
तंत्र युगात, आनलाईन पाठवत़ो
चित्र काव्यातून मानतो, बहिण
यातूनही बंधू प्रेम, त्यात टिकवत़ो …८

भाऊ घालत़ो ओवाळणी तिला
जरी नसली,बहिणीची अपे‌‌क्षाचे
तरी चालवतो, रितीरिवाज भाऊ
जपतो स्वाभिमान, या जीवनाचे …९

एखाद्या भावास, नसली जर बहिण
शल्य असते त्याला त्याच्या मनातून
मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी
वागतो तो. सर्व मुलीशी‌ जपून …१०

असा हा सण असतो रक्षाबंधन
चालत राहिल संस्कृती, परंपरा
उपकार नसावे,कुणाचे कुणावर
द्यावा बहिणीला,जीवनभर आसरा…११

जयद्रथ आखाडे
जिल्हा पुणे


बहिणीची माया आणि बहिणीला आसरा | 2 Best Happy Raksha Bandhan Marathi Poem

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

बहिणीची माया आणि बहिणीला आसरा | 2 Best Happy Raksha Bandhan Marathi Poem

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *