Heart love kavita in marathi

हृदयी वसंत फुलतांना, मी नव्याने मला गवसते आणि साद वेड्या मनाची | 3 best Heart love kavita in marathi

मंगल राजाराम यादव, डॉ. वैशाली शेंडगे आणि अब्दुलकरीम शमशोद्दीन सय्यद यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Heart love kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Heart love kavita in marathi

काव्यबंध समूह,काव्यलतिका आयोजित साप्ताहिक स्पर्धा.
दि,५/११/२०२३
विषय-हृदयी वसंत फुलताना.

हृदयी वसंत फुलताना | Heart love kavita in marathi

मनात प्रिती वसली,
नाजूक कळी उमलतात,
सुगंधित होउन मन डोले,
हृदयात वसंत फुलताना….

हळूच वार्‍याची अल्लड खोडी,
बटा अवखळ भारी मुखावरी,
भिर भिर नजर फिरे चोहिकडे,
खिळते नयन प्रियकरावरी…

हृदयात वसंत फुलताना ,
स्वप्नांचा सजवतो मळा,
उरात धडधड मावेना,
शब्द ओथंबून थांबती गळा..

मन उत्साही, आनंदी,
निळ्या आभाळातील स्वच्छंदी पक्षी,
गाणे गातो मुक्त प्रीतीची,
सूर्य, चंद्र तारे राहती साक्षी…

हृदयी वसंत फुलताना,
वसुंधरा सजली लेवून साज,
निसर्गही नेसतो शालू हिरवा
मग अवतरते गाली लाज….

क्षण क्षण विचार असतो
स्वप्नांचे जग वेगळे असते,
जाता येता नयन बोलके,
अपार प्रितीचा बहर सजतो…

हृदयात वसंत फुलताना,
दुःखाला नसतो थारा,
सगळीकडे लुकलुकणाऱया चांदण्या
वाहत राहतो मंद,मंद सुगंधित वारा.

मंगल राजाराम यादव.
शिराळा.

Heart love kavita in marathi

काव्यबंध समूह आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार आयोजित स्पर्धा

दिनांक :- ०५/११/२०२३

स्पर्धेसाठी

विषय :- हृदयी वसंत फुलताना

मी नव्याने मला गवसते | Heart love kavita in marathi

हृदयी वसंत फुलतांना, मी नव्याने मला गवसते आणि साद वेड्या मनाची | 3 best Heart love kavita in marathi

शिशिराची थंडी ती जाऊनी
वसंताचे आगमन होते
पानगळ झालेल्या झाडांना
नवी पालवी फुटूनी येते !!४!!

कसे सृष्टीत नवचैतन्य येते
चैत्र मासाची चाहूल येते
कोकिळेचे मधुर गायन
आनंदित मनाला करते!!२!!

नववधूसम भासे सृष्टी
नवी दुलई ती पांघरते
बहरतो सारा आम्रवृक्ष
वसंताची किमिया कळते!!३!!

हृदयी माझ्या वसंत फुलतो
सौदर्य ते चिंब चिंब करते
जुन्या स्वप्नांना पंख लाभते
मनी जिद्दीची पालवी फुटते!!४!!

घनदाट काळोख सरतो
आत्मविश्वासाला बहरतो
दुनियेत स्वच्छंदी त्या माझ्या
चैतन्याचा हा वर्षाव करतो!!५!!

गंध फुलांचा सांगुनी जातो
रंग प्रेमाचे मनी भरतो
सांगे सृष्टीचे सारे सोहळे
तार हृदयाची कशी छेडतो !!६!!

नव्यारुपासम त्या सृष्टीच्या
मीही थोडी बदलत जाते
हृदयी वसंत तो फुलताना
मला नव्याने मी गवसते!!७!!

डॉ वैशाली शेंडगे
सांगली

Heart love kavita in marathi

स्पर्धा करीता
काव्यबंध समूह
काव्यलतिका रविवारची स्पर्धा
दि . ०५ नोहें . २०२३
विषय= ह्यदयी वसंत फुलतांना

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
साद वेड्या मनाची | Heart love kavita in marathi
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

best Heart love kavita in marathi

नजरेचा बाण तो हृदयातून निघाला
मनाने दिली साद वेड्या मनाला
फुटले न शब्द, न केला इशारा
न कळले दैवास,न समजले कुणाला, १

प्रेम हे वेडे ,न पाही वयाला
जाती पातीचे त्याला बंधन कशाला
आहे काय प्रेमात केल्यावर कळते
धडकते ह्दय हे, तिच्याच उशाला. २

माहीत नव्हतं काय असतयं प्रेम
कधी होतय कुणावर नसतोय नेम
शरीरावर कुणाचे., कुणी सुंदर मनावर
प्रित सर्वांची कधी नसतेच सेम.. ३

कळी गुलाबाची अशी प्रेमात असते
परिभाषा प्रितीची तिला समजत नसते
उमले पाकळी धुंद वाऱ्याच्या झुळकेत
दगाबाज वाऱ्यावर कळीचे प्रेम बसते. ४

न माहीत असते न जाणीव असते
अचानक का प्रेम कुणावर बरसते
प्रेमात नसते काय ठरवलेले सुत्र
पहिल्या थेंबाला पावसाच्या चातक तरसते. ५

प्रेम होते भुंग्यास सुंदर कमळाचे
पाकोळीस प्रेम दिव्याच्या ज्योतीचे
प्रेमातच अडकतो मासा गळास
खरे प्रेम शिंपला अन् मोतीचे.. ६

न भिती प्रेमाला, नसे कुणाचा धाक
खरे प्रेम साक्षात प्रभुचा आशीर्वाद
हृदयी वसंत फुलतांना ठेवा जाणीव एक
जबरदस्ती न चाले, प्रेम असतो आशावाद.७

अब्दुलकरीम शमशोद्दीन सय्यद
पंढरपूर

Heart love kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *