Heart Touching Marathi Kavita On Life

Heart Touching Marathi Kavita On Life | आयुष्यावर हृदयस्पर्शी कविता मराठी

आयुष्यावर कविता लिहिणारे भरपूर कवी/ कवयत्री तुम्ही पहिल्या असतील. तुम्ही म्हणाल आता हिने काय अजून लिहिलंय. नवीन लोकांना काय जमणार ? असा प्रश्न देखील पडला असेल. पण ते तुम्ही ठरवा. कारण आयुष्य हा प्रत्येकाचा विषय आहे. त्यावर कितीही लिहील गेल तरी ते कमीच पडेल असं मला वाटत. म्हणून मी सुद्धा माझी कविता तुमच्या समोर घेऊन आले आहे. वाचा Heart Touching Marathi Kavita On Life | आयुष्यावर हृदयस्पर्शी कविता मराठी . आवडल्यावर नक्कीच शेअर करा.

वाढदिवसाचा दिवशीच आपल्या मृत्यूचा दिवस ठरलेला आहे.
ह्या दोन दिवसांच्या मध्ये कस जगायचं ते मात्र आपल्या हातात आहे.

इतरांना दूषणं देत जगायचं आणि गर्वात राहायचं आहे.
कि आयुष्याचा आनंद घेत जगायचं आणि चांगल निवडायच आहे ?

Heart Touching Marathi Kavita On Life | आयुष्यावर हृदयस्पर्शी कविता मराठी


जन्माला आल्याबरोबर सुख आणि दुःखाचा हिशोब झालेला असतो.
आपण विनाकारण “असं झाल ” किंवा “तसं झाल” बोलत असतो.

Heart Touching Marathi Kavita On Life | आयुष्यावर हृदयस्पर्शी कविता मराठी

आपल्या आसपास च्या व्यक्ती सुद्धा कोण किती छान आणि कोण वाईट.
कोण कस निघणार हे सुद्धा विधात्याने ठरवलं आहे एकदम सराईत .
आयुष्य नावाच्या सारीपाटावरच्या ह्या सगळ्या आहेत प्याद्या.
आपण फक्त आपला डावावर डोळा ठेवून वर्तमानावर लक्ष द्या
.

विधात्याने तुमच्या सर्व चाली लिहून ठेवल्या आहेत.
बदल त्यात करता येत नाही आल का तुमच्या लक्षात
?
आपल्या कडून कोण करवून घेतो हे जाणून घ्या .
आणि सर्व चाली होताना चिंता सोडून द्या
.

विश्व बदलण्याचा खटाटोप कशाला ?
स्वतः कडे लक्ष द्या .
दुसरा असा कसा वागतो ?
हे व्यर्थ प्रश्न अजिबात नको .

Heart Touching Marathi Kavita On Life | आयुष्यावर हृदयस्पर्शी कविता मराठी


ती त्याची सारीपाटावरची चाल असेल ,
पण ते बघताना आपला खेळ पुढे निसटेल
!

देवासाठी जरी सारीपाट असला, तरी तो आपण खेळ समजू नये.
मौज मजा करण्यासाठीच सहजच मिळालेला वेळ समजू नये,
हे आहे एक अवघड कोडं,
कितीही सोडवल तरी थोडं,
म्हणुन म्हणत असते जीवनात, माणसं मिळवता आली तर बघा !
सुह्खात दुःखात नाती जोडता आली तर पहा !
रक्ताची नसली नाती तरी मैत्री करून बघा.
कठोर मन हलके होते का ते शोध.
मरताना सोबती कोण हे आहे का हातात कुणाच्या ?
सरना वरचे चार खांदेकरी जिवंत असतानाच निवडून बघा.

Heart Touching Marathi Kavita On Life | आयुष्यावर हृदयस्पर्शी कविता मराठी

तुम्हाला माझी आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा.

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

How useful was this post?

Click on a star to rate it!

Average rating 0 / 5. Vote count: 0

No votes so far! Be the first to rate this post.

As you found this post useful...

Follow us on social media!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
14 − 13 =